शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

हवा तो अहवाल दिला जात असल्याने खासगी लॅबना कोरोना तपासणीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:22 IST

खासगी लॅबमध्येही कोरोना चाचण्यांसाठी जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देरुग्णांकडून मनमानी पद्धतीने फी वसुलीखासगीत २७ हजार तपासण्या

औरंगाबाद : खासगी लॅबमधून नागरिकांना पाहिजे तसा अहवाल दिला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच तपासणीसाठी मनमानी दर वसूल केले जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्‍त झाल्या. त्यामुळे महापालिकेने खासगी लॅबचालकांना कोरोना तपासणी करण्यास बंदी घातली आहे.

मागील वर्षी रुग्णांचे स्रावांचे नमुने घेण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत असल्यामुळे खासगी लॅबना कोरोना तपासणीची मुभा दिली होती. शहरात मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. वर्षभरानंतर पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली. रोज नव्याने एक हजार रुग्ण आढळत आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्‍तींच्या कोरोना तपासण्या करण्यासाठी पालिकेने पथके नेमली आहेत. खासगी लॅबमध्येही कोरोना चाचण्यांसाठी जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. शहरात दोन ठिकाणी खासगी लॅब आहेत. यांतील एक लॅब समर्थनगरात तर दुसरी सूतगिरणीच्या परिसरात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना या खासगी लॅबमधून नागरिकांना पाहिजे तसा अहवाल दिला जात असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी नागरिकांकडून अधिकचे शुल्कही वसूल केले जात आहे. याबाबत तक्रारी प्राप्‍त झाल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेऊन खासगी लॅबला कोरोना चाचणी करण्यास बंदी आदेश मंगळवारी जारी केला. यापुढे रुग्णांच्या घरी जाऊन स्राव घेऊ नये, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. संशयित रुग्णांनी पालिकेच्या केंद्रात जाऊनच चाचणी करावी, असे आवाहनही केले आहे.

खासगीत २७ हजार तपासण्यामहापालिकेकडून प्राप्‍त अहवालानुसार सोमवारी (दि. २२) शहरात या दोन्ही खासगी लॅबमधून तब्बल ५८८ नागरिकांनी कोरोना चाचणी केली. वर्षभरात खासगी लॅबमधून २७ हजार ३३० तपासण्या करण्यात आल्या. त्यांपैकी ३ हजार ७०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत; तर २३ हजार ६२६ तपासण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद