शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
"कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
6
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
7
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
8
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
9
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
11
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
12
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
13
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
14
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
16
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
17
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
18
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
19
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
20
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

खाजगी बस उलटली; २२ प्रवासी जखमी

By admin | Updated: July 25, 2016 00:37 IST

उमरगा : तालुक्यातील येळी गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास एक खासगी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात तब्बल २२ प्रवासी जखमी झाले़

उमरगा : तालुक्यातील येळी गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास एक खासगी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात तब्बल २२ प्रवासी जखमी झाले़ चालकाने झोपेतच बस चालविण्याचे चूक केल्याने त्याचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून, घटनेनंतर चालक फरार झाला़ अपघातातील सहा गंभिर जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ तर जखमींवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून हैद्राबादकडे जाणारी एक खासगी बस (क्ऱएम़एच़१२- के़जी़३००६) ही रविवारी पहाटेच्या सुमारास जात होती़ चालक झोपेतच गाडी चालवित असल्याने येळी गावाजवळील रामपूर पाटीनजीकच्या ही बस क्लिनरच्या बाजूने झुकल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले़ प्रवाशांनी चालकाला सुचना देईपर्यंत त्याने बस पुढेच नेली़ येळी गावाजवळ ही बस आली असता भाऊसाहेब बिराजदार विद्यालयानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली़ भरधाव वेगात पलटी झाल्याने ही बस १०० ते १५० मीटर घसरत गेली़ या अपघातात साखर झोपेत असलेल्या महिला, पुरूषांसह बालकेही जखमी झाली आहेत़ अनेकांच्या हाताला, पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली़ यात आठ पुरूष, आठ महिला व पाच लहान मुले व एका मुलीचा समावेश आहे़ बस पलटी झाल्यानंतर मोठा आवाज आल्याने येळी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली़ त्यानंतर पोलिसांनी व जकेकूर, रामपूर येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी जावून जखमींना उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले़ ग्रामस्थांच्या मदतीमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. अपघाताची उमरगा ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती़हे प्रवासी झाले जखमी४खासगी बस पलटी होवून झालेल्या अपघातात दामोदर दशरथ चव्हाण (वय-६४ रा़ मुळज ता़उमरगा), मोतीराम सुभाष पवार (वय-४० रा़ निलंगा), क्रिश राजू जाधव (वय-०३), निकिता राजू जाधव (०६), राजू परशुराम जाधव (४० सर्व रा़बसवकल्याण), ज्ञानेश्वर जोतीबा शिंदे (४०), प्रमोद ज्ञानेश्वर जाधव (०५ दोघे रा़ उमरगा), विठूबाई दत्तू बनसोडे (२१ रा़ निलंगा), ओंकार गौतम सूर्यवंशी (०४ रा़ अतसूर वाडा निलंगा), राम बिभिषण जगताप (०७ वाडेगाव ता़लातूर), पार्वती सत्यवान सयाजी (३०), माया ब्रम्हानंद भारती (५० दोघी रा़ निलंगा), रवी संतोष पवार (०५ धनेगाव ता़देवणी), छाया मुकुंद पाटील (४५ कोंडजीगड ता़निलंगा), व्यंकट विठ्ठल शिंदे (५०), अंबुलगा ता़निलंगा), निर्मला देविदास मोरे (६० उमरगा), बालाजी नागनाथ चव्हाण (५०), उमाबाई बालाजी चव्हाण (४५ दोघी रा़मुळज), सविता विश्वनाथ जाधव (४५ रा़ उजळंब ता़बसवकल्याण) हे २२ प्रवाशी जखमी झाले़ तर मोतीराम पवार, क्रिश जाधव, निकिता जाधव, प्रमोद जाधव, विठूबाई बनसोडे व ओंकार सूर्यवंशी हे सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़