शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत हवालदाराला मारहाण करून कैदी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:43 IST

लॉकअपमध्ये बंद असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांनी कर्तव्यावरील पोलीस हवालदाराकडे पाण्याची मागणी केली. हवालदाराने पाण्याची बाटली देण्यासाठी लॉकअप उघडले. दार उघडताच त्या कैद्यांनी हवालदाराला खाली पाडून बेदम मारहाण केली आणि त्यांनाच आत डांबून बाहेरून कडी लावून पलायन केले.

ठळक मुद्देघाटी रुग्णालयातील वॉर्ड लॉकअपमधील घटना : रात्री रचला कट, रुग्णवाहिकेच्या चालक-मालकाने पाठलाग करून एकाला पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लॉकअपमध्ये बंद असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांनी कर्तव्यावरील पोलीस हवालदाराकडे पाण्याची मागणी केली. हवालदाराने पाण्याची बाटली देण्यासाठी लॉकअप उघडले. दार उघडताच त्या कैद्यांनी हवालदाराला खाली पाडून बेदम मारहाण केली आणि त्यांनाच आत डांबून बाहेरून कडी लावून पलायन केले. हा प्रसंग एखाद्या सिनेमातील नव्हे, तर औरंगाबादेतील घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १० मध्ये सोमवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडलेली सत्य घटना आहे. हवालदाराच्या आरडाओरडीमुळे रुग्णवाहिकेच्या चालक-मालकांनी पाठलाग करून एका आरोपीला पकडले.सोनू दिलीप वाघमारे (२२, रा. राजीवनगर, रेल्वेस्टेशन उड्डाणपूल परिसर), असे पळून गेलेल्या आरोपीचे, तर अक्षय शाम आठवले (२०, रा. बीड), असे पळून जाताना पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. सोनू वाघमारे याला मोबाईल आणि दागिने लुटल्याच्या गुन्ह्यात न्यायालयाने आठ महिन्यांपूर्वी एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली, तेव्हापासून तो हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत होता. पाय दुखत असल्याच्या कारणावरून जेल प्रशासनाने सोनूला ३० मार्च रोजी घाटी रुग्णालयात दाखल केले. आरोपी अक्षय याच्याविरोधात बीड येथे विविध गुन्हे दाखल आहेत. दीड वर्षापूर्वी एका हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून त्याने वेटरवर गावठी पिस्टलमधून गोळीबार केला होता. वेटरने गोळी चुकविली होती, मात्र त्याच गोळीतील छर्रे अक्षयच्या छातीत घुसल्याने तो जखमी झाला होता. बीड पोलिसांनी अक्षयसह त्याच्या साथीदारांवर मोक्कांतर्गत गुन्हे नोंदविलेले आहेत. तेव्हापासून तो बीड जिल्हा कारागृहात कैद होता. त्याच्या पाठीत गाठ झाल्याने १९ एप्रिल रोजी बीड पोलिसांनी त्याला उपचारासाठी घाटीत दाखल केले. दोन्ही आरोपी वॉर्ड क्रमांक १० मधील एकाच बराकीत उपचार घेत होते.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धावया घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलीस निरीक्षक राजर्षी आडे, राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र क त्तुल, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाºयांनी घाटीत धाव घेतली. मारहाणीत जखमी झालेल्या जोशी यांना तातडीने घाटीत दाखल करण्यात आले. याप्रकरणी हवालदार जोशी यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.पोलीस हवालदाराला मारहाण करून पळून जाताना जनतेच्या मदतीने पकडलेल्या अक्षय श्याम आठवले या आरोपीची रवानगी सोमवारी सायंकाळी हर्सूल कारागृहात करण्यात आली. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाºयांनी त्याला कारागृहात नेऊन सोडले.पोलीस उपायुक्तांकडून चौकशी- मिलिंद भारंबेया घटनेविषयी बोलताना प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले की, या घटनेची सखोल चौकशी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर या घटनेसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. वॉर्ड क्र मांक १० मध्ये उपचार घेणाºया कैद्यांना ते जेलमध्येच आहे असे वाटले पाहिजे. अशा प्रकारचे ते लॉकअप असणे आवश्यक आहे. कैद्यांना सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांपैकी एक जण चहा पिण्यासाठी गेला होता. पोलीस चहा पिण्यासाठी जाऊ शकतो; मात्र कैदी सुरक्षित आहे का, याची खात्री करणे त्याचे आद्यकर्तव्य आहे. तेव्हा एकच हवालदार तेथे असल्याची संधी साधून आरोपींनी त्यांना मारहाण करून पलायन केले.

टॅग्स :PrisonतुरुंगAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल