शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगीत सिंचन कामांना प्राधान्य

By admin | Updated: October 25, 2015 23:58 IST

जालना : घनसावंगी विधानसभा मतदार संघात गत पंधरा वर्षांत सिंचनाची कुठलीही कामे न झाल्याने या भागात भीषण पाणी टंचाई आहे.

जालना : घनसावंगी विधानसभा मतदार संघात गत पंधरा वर्षांत सिंचनाची कुठलीही कामे न झाल्याने या भागात भीषण पाणी टंचाई आहे. म्हणूनच शिवसेनेच्या माध्यमातून आपण या मतदार संघात सिंचनाच्या कामाना प्राधान्य देणार असल्याची माहिती डॉ. हिकमतराव उढाण यांनी येथे रविवारी दिली.डॉ. उढाण यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात विकास कामे तुलनेने कमीच झाली आहेत. आजही हे भाग मागासलेले राहिले आहेत. परिणामी सर्वच लोकांचा आर्थिक स्तर उंचावू शकला नाही. या सर्व बाबींचा अभ्यास केल्यानंतर घनसावंगी तालुक्यातील दहा गावांमध्ये सिंचनाची कामे करण्याचा निर्धार केला. त्यानुसार उढाण कंडारी येथे याची सुरुवात करण्यात आली आहे. उर्वरित गावांमध्ये लवकरच ही कामे सुरु केली जातील. सिंचनाअभावी विकास रखडला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून या भागात सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत. आघाडी सरकारने या भागाच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष केले आहे. गत पंधरा वर्षांत सत्तेत असूनही या भागातील लोकप्रतिनिधी विकासाच्या योजना या भागासाठी आणू शकले नाहीत. परिणामी हा भाग विकासापासून कोसोदूर राहिला आहे. मात्र, शिवसेनेच्या शिवजलक्रांती व इतर योजना राबविणार असून, आगामी काळात अधिक सक्रीय होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. गेल्या पंधरा वर्षांपासून आघाडी सरकारचे राज्य होते. परंतु अंबड आणि घनसावंगी विधानसभा मतदार संघात विकासाची कामे होऊ शकलेली नाहीत. परिणामी या भागातील ग्रामस्थ आजही विकासापासून कोसो दूर आहेत. आगामी काळात शिवसेनेच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. उढाण म्हणाले.