शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य

By admin | Updated: May 3, 2017 00:22 IST

जालना : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पहिले प्राधान्य राहणार असल्याचे मत नूतन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केले.

जालना : जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पहिले प्राधान्य राहणार असल्याचे मत नूतन पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केले. मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी पोकळे यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.पोकळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी कायदा व सुव्यवस्थेसह विविध मुद्यांवर वार्तालाप केला. पोकळे म्हणाले, जिल्ह्यात मी काही नवीन नाही. याआधी सुध्दा भोकरदन तालुक्यात डीवायएसपी पदी चार वर्षे काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काम करीत असताना जुना अनुभव निश्चितच कामी येणार आहे. येथील भागाशी जोडलेलो असल्याने काम करण्यास सोपे जाईल. त्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे असल्याचे मत सुध्दा पोकळे यांनी व्यक्त केले. सर्वसामान्यांना पोलिसाकडून मोठ्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी आमचा पहिला प्रयत्न राहील. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अंकुश ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्याचे माझे पहिले प्राधान्य राहणार आहे. भोकरदन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करीत असताना अनेक गुन्हेगारी टोळीशी सामना झाला आहे. आत्ता जिल्ह्याचा पोलीस प्रमुख या नात्याने आत्ता जिम्मेदारी वाढली आहे. माझ्या सहकार्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी माझे प्रयत्न राहणार असल्याचे पोकळे यावेळी म्हणाले. त्यासाठी माझा पोलीस दलातील २३ वर्षाचा अनूभव कामी येईल.महिलांच्या सुरक्षतेसाठी कार्यरत दामिनी पथक असो वा अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येत असलेले कामे चांगली आहेत. यात काही नव्याने उपाययोजना करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यास आपला प्रयत्न राहणार आहे. यावेळी उपअधीक्षक अभय देशपांडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, अनंत कुलकर्णी, साईनाथ ठोंबरे, विनोद इज्जपवार, बाळासाहेब पवार, भगीरथ देशमुख योगेश गावडे उपस्थित होते.