शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

यात्रेपूर्वी तिजोरीत ४९ लाख रु.जमा

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुऱ्यात भरविण्यात येणाऱ्या यात्रेच्या भाड्यापोटी छावणी परिषदेला ४८ लाख ९८ हजार रुपये प्राप्त झाले आहेत.

औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त कर्णपुऱ्यात भरविण्यात येणाऱ्या यात्रेच्या भाड्यापोटी छावणी परिषदेला ४८ लाख ९८ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. उल्लेखनीय म्हणजे परिषदेला पहिल्यांदाच एवढे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. मराठवाड्यातील खूप मोठी यात्रा म्हणून कर्णपुरा यात्रेची ख्याती पसरली आहे. कर्णपुऱ्यातील देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात दररोज लाखो भाविक येथे येत असतात. कर्णपुऱ्यातील सुमारे ६ एकर जागेवर ही यात्रा भरविण्यात येते. यासाठी दरवर्षी छावणी परिषद टेंडर काढीत असते. यात यात्रेच्या जागेचे भाडे व पार्किंगच्या भाड्याचा समावेश असतो. दोन्ही टेंडर एकाच दिवशी काढण्यात येतात. मागील वर्षी यात्रेच्या जागेचे टेंडर अवघ्या १७ लाख रुपयांत, तर पार्किंगच्या जागेचे टेंडर ३ लाख ९१ हजार रुपयांत गेले होते. यंदा यात्रेचे टेंडर ४४ लाख रुपयांमध्ये, तर पार्किंगचे टेंडर ४ लाख ९८ हजार रुपयांत देण्यात आले. पहिल्यांदाच यात्रेच्या टेंडरमधून छावणी परिषदेच्या तिजोरीत ४९ लाख रुपये जमा झाले. यासंदर्भात परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत लोटे यांनी सांगितले की, यंदा टेंडरमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. याचा फायदा छावणी परिषदेला झाला. परिषदेच्या वतीने यात्रेत पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे. याशिवाय वीजपुरवठा करण्यात येणार आहे. पथदिवे लावण्यात येणार आहेत. भाविकांच्या सेवेत डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पथकही येथे नेमण्यात येणार आहे.