शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत ‘मागेल त्याला घर’ या घोषणेप्रमाणे पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेला औरंगाबाद शहरात भरभरून प्रतिसाद मिळाला. तब्बल ८० हजार नागरिकांनी महापालिकेकडे आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले. मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे योजनेला अद्याप मुर्हूतच सापडलेला नाही.

ठळक मुद्देमनपाचीच अनास्था : बांधकाम व्यावसायिकांनाच दोषी ठरविले

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत ‘मागेल त्याला घर’ या घोषणेप्रमाणे पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेला औरंगाबाद शहरात भरभरून प्रतिसाद मिळाला. तब्बल ८० हजार नागरिकांनी महापालिकेकडे आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले. मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे योजनेला अद्याप मुर्हूतच सापडलेला नाही. शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराची चिरफाड केली. प्रशासनानेही या योजनेत बांधकाम व्यावसायिक सहकार्य करीत नसल्याचे सांगितले. विशेष बाब म्हणजे सत्तेत असलेल्या भाजपनेही या स्तुत्य उपक्रमासाठी पुढाकार घेतला नाही.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील बेघर नागरिकांकडून २०१६-१७ मध्ये आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. तब्बल ८० हजार अर्ज दाखल झाले. या अर्जांचे पुढे काय झाले? असा प्रश्न शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी उपस्थित केला. उपअभियंता शेख खमर यांनी खुलासा केला की, अर्जांची छाननी करून पाच हजार घरांसाठी डीपीआर (प्रकल्प आराखडा) तयार करून तो मुंबई येथे म्हाडाकडे पाठविला होता. असंख्य नागरिकांकडे मालकी हक्काचा पुरावा (रजिस्ट्री, पीआर कार्ड) नाही. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. महापालिकेने दाखल केलेल्या पाच हजार प्रस्तावांमध्ये २० बाय ३० आकाराच्या म्हणजेच बॉण्ड पेपरवरील घरांचा अधिक समावेश होता. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. नव्याने प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. बिल्डरांच्या भागीदार योजनेतही मनपाने वारंवार बैठका घेतल्या. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. बिल्डर भागीदार योजनेत मनपाकडे प्राप्त अर्जांमध्ये ५२ हजार नागरिकांचा समावेश आहे. योजनेच्या या परिस्थितीमुळे सभापतींनी यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्याचे निर्देश दिले.मुख्यमंत्र्यांची सूचनामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मनपासोबत आढावा घेतला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आवास योजनेवर विशेष लक्ष केंद्रित करा, अशी सूचना केली होती. त्यानंतरही महापालिकेने ठोस उपाययोजना केली नाही. निव्वळ कागदी घोडे नाचविणे सुरू केले आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCentral Governmentकेंद्र सरकार