शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादेत प्राथमिक शिक्षक संघाचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:27 IST

राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या व इतर मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजि.प. परिसर दणाणला : जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांसह सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या व इतर मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.पूर्वी शिक्षकांसह अन्य कर्मचाºयांना जुनी पेन्शन व भविष्यनिर्वाह निधीची योजना सुरू आहे. मात्र, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षक व कर्मचाºयांना नवीन परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली. शासनाने नवीन पेन्शन योजनेच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचाºयांवर अन्याय केला आहे. या अन्यायाच्या विरोधात प्राथमिक शिक्षक संघाने शनिवारी आंदोलनाचा निर्णय घेतला होता.परिभाषित अंशदायी पेन्शन योजनेंतर्गत कपात करण्यात आलेल्या रकमेचा हिशेब देण्यात यावा, चट्टोपाध्याय वेतनश्रेणीबाबत जाचक शासन निर्णय रद्द करून पात्र शिक्षकांना वेतनश्रेणीचा तात्काळ लाभ देण्यात यावा, पात्र शिक्षकांना प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात यावी, शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेलाच केले जावे, पुरवणी देयके निकाली काढण्यात यावी, भाषासूट आणि स्थायित्वाचा लाभ तात्काळ देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जे. के. चव्हाण, हारुण शेख, प्रशांत हिवर्डे, प्रवीण पांडे, संजय भुमे, दिलीप साखळे, राजेश पवार, बळीराम भुमरे, संजय भडके, नारायण साळुंके, भास्कर चौधरी, राहुल पवार, ईश्वर पवार, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश सरोते, अशोक डोळस, राजेंद्र महाजन, गया शिरवत, शकिला न्हावकर, मीनाक्षी राऊत, स्वाती भाले, रिता पाडळकर, शाहीन परवीन, महानंदा गुट्टे, राजश्री पाटील, अरुणा मेथे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे सचिन एखंडे, राजेंद्र गोर्डे, दीपक नरवडे, योगेश खरात व अन्य पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.