नांदेड : जिल्ह्यत एकीकडे पेरणीचा हंगाम आटोपत आला असतांना दुसरीकडे हळद बाजारात काही प्रमाणात तेजी जाणवू लागली आहे. बुधवारी झालेल्या लिलाव बाजारात हळदीला सर्वोच्च ७५०० रु. प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.मोंढा बाजारात बुधवारी झालेल्या लिलावात हळदीला कमीतकमी ६५०० ते ७५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यत भाव मिळाला. नवा मोंढा येथील आडत व्यापारी केशव नारायण टाकळगांवकर यांच्या आडत दुकानावर झालेल्या बिटात हळदीला सर्वोच्च दर मिळाला. सध्या बाजारात हळदीची आवक दिवसाकाठी एक हजार ते १२०० क्विंटल एवढी आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवातीला हळद भिजल्यामुळे बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांना दराचा फायदा मिळाला होता. यानंतर हळदीचे दर चांगले वाढले होते मात्र पेरणीचा हंगाम आल्याने पुन्हा घसरले. पेरणीचा हंगाम संपत आल्यामुळे तसेच पावसाचे प्रमाण कमी असल्याने बाजारात हळदीने काही प्रमाणात उसळी घेतली आहे. एप्रिल - मे महिन्यातील आवक होती, त्यापेक्षा आजघडीला कमी आहे. यामुळे व्यापाऱ्याकडून मागणीही वाढत आहे. (प्रतिनिधी)
लिलाव बाजारात हळदीचे भाव वाढले
By admin | Updated: August 8, 2014 00:34 IST