शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

भूईमुगास ३४४५ रूपयांचा भाव

By admin | Updated: May 22, 2014 00:35 IST

हिंगोली : आर्थिक चणचणीपायी काढणी होताच उत्पादकांनी भूईमुगास बाजार दाखविण्यास सुरूवात केली आहे. परिणामी हिंगोली बाजार समितीत दिवसेंदिवस भूईमुगाची आवक वाढत आहे;

हिंगोली : आर्थिक चणचणीपायी काढणी होताच उत्पादकांनी भूईमुगास बाजार दाखविण्यास सुरूवात केली आहे. परिणामी हिंगोली बाजार समितीत दिवसेंदिवस भूईमुगाची आवक वाढत आहे; परंतु भाव स्थिर राहत असल्यामुळे बुधवारी उत्पादकांना क्विंटलामागे ३ हजार ४४५ रूपयांचा कमाल भाव मिळाला. जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पाण्याचे सर्व स्त्रोत पूर्णत: भरल्याने उन्हाळी पिकांची हमी उत्पादकांना होती. रबी हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने हातचे पीक निघून गेले होते. दोन्ही हंगाम निघून गेल्यामुळे खताबियाण्या इतका पैसा भूईमुगाच्या पिकातून वसूल करण्याचा उत्पादकांचा बेत होता. पाण्याची कमतरता यंदा भासणार नसल्याने गतवर्षीपेक्षा यंदा भूईमुगाचा पेरा अधिक झाला होता. दरम्यान, शेतकर्‍यांनी खते, फवारणी, निंदणी करून भूईमुगाची निगा राखली होती; परंतु पावसाचा धडाका उन्हाळ्यातही सुरूच राहिला. पीक जोमात असताना दोन-तीन वेळा पावसाने हजेरी लावली. पावसामुळे आभाळ आल्याने भूईमुगावर अळीचा प्रादुर्भाव झाला. त्याचा परिणाम पीक वाढीवर आणि उत्पन्नावर पहावयास मिळाला. आता काढणी झाल्यानंतर भूईमुगाला येत असलेल्या उतार्‍यातून त्याची प्रचिती उत्पादकांना आली. मागील वर्षी पाण्याची कमतरता भासूनही एका बॅगला १० ते १२ पोत्यांचा उतारा आला होता. यंदा उत्पादन खर्च आणि पाण्याचा मूबलक पुरवठा करूनही २ ते ४ पोत्यांनी भूईमुगाचा उतारा घटला. एकीकडे अधिक खर्च करूनही उत्पादनात वाढ झाली नसल्यामुळे उत्पादकांची निराशा झाली. बहुताश उत्पादकांना भूईमुगाच्या पिकावर खरीप हंगामातील बियाण्याची खरेदीची मदार होती. भूईमुगाच्या विक्रीतून खत, बियाणे खरेदी करण्याचा बेत आखला होता; परंतु अपेक्षित उत्पादनाअभावी शेतकर्‍यांची साफ निराशा झाली. त्यातच भूईमुगाला बाजारात म्हणावा तशा भावही मिळत नाही. काढणी होताच उत्पादांनी भूईमुगाला बाजार दाखविण्यास सुरूवात केल्याने हिंगोली बाजार समितीच्या मोंढ्यात भूईमुगाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु भाव मात्र स्थिर असल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडत आहे. बुधवारी सकाळी ३ हजार ११५ रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार अपेक्षित वाढ न होता ३ हजार ४४५ रूपयांपर्यंत कमाल दर गेला. मागील पंधरवाड्यापासून भूईमुगाची खरेदीस सुरूवात झाली असताना भावात वाढ होताना दिसत नाही. (प्रतिनिधी) जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे पातळीत वाढ झाल्याने पाण्याची कमतरता भासणार नसल्याने यंदा भूईमुगाचा पेरा झाला होता अधिक. मागील वर्षी खरीप आणि रबी हंगाम हातचा निघून गेल्यामुळे खताबियाण्यासाठी लागणारा पैसा भूईमुगाच्या पिकातून वसूल करण्याचा होता जिल्ह्यातील उत्पादकांचा होता बेत. शेतकर्‍यांनी खते, फवारणी, निंदणी करून भूईमुगाची निगा राखली होती; परंतु उन्हाळ्यातही सुरूच राहिला पावसाचा धडाका . पीक जोमात असताना दोन-तीन वेळा पावसाने हजेरी लावली तसेच आभाळ आल्याने भूईमुगावर झाला होता अळीचा प्रादूर्भाव. पावसामुळे पीक वाढीवर आणि उत्पन्नावर परिणाम पहावयास मिळाल्याने आता पीक काढणी झाल्यानंतर येत आहे उतार्‍यात घट. बुधवारी सकाळी ३ हजार ११५ रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. दरम्यान भूईमुगाच्या दर्जानुसार अपेक्षित वाढ न होता ३ हजार ४४५ रूपयांपर्यंत स्थिरावला कमाल दर.