ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 16 - हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्या आ.अब्दुल सत्तार यांना अटक करा या प्रमुख मागणीसाठी सिल्लोड येथील आंबेडकर चौकात शुक्रवारी सकाळी 12:30 वाजता दीड तास शिवसेनेतर्फे गटनेता सुनील मिरकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करून तीव्र निदर्शन करण्यात आली.यावेळी काही आंदोलन कर्त्यानी बसवर दगड फेक केली.दीड तास रास्ता रोको झाल्याने रस्त्या च्या दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.जळगाव औरंगाबाद रस्त्यावर दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. आ. अब्दुल सत्तार यांना जो पर्यन्त अटक करीत नाही तो पर्यन्त आम्ही रास्ता रोको मागे घेत नाही.. असा हट्ट आंदोलन कर्त्यानी धरल्याने ...पोलिसांनी आंदोलन कर्त्याना अटक केली. यावेळी एक आंदोलन कर्त्यानी रावेर पुणे एसटी बस क्रमांक एम एच 20, बी. एंन.2659 वर दगड फेक केली. यात बसच्या काचा फुटल्या.. मात्र कुणी जखमी झाले नाही.या मोर्चा मध्ये सिल्लोड शहरासहित तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संखेने हजर होते. अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक भागिरत देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक रशीद शेख, फौजदार एस. बी. सावले, सरिता गाढ़े सहित पोलीस फ़ोर्स मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. रास्ता रोको करताना काही काळ आन्दोलनाला हिंसक वळन लागेल असे चित्र दिसत होते.मात्र पोलिसांनी तात्काळ 45 आन्दोलकाना अटक करुन सुटका केल्याने अनुचित घटना घडली नाही.या वेळी गटनेता सुनील मिरकर, जिल्हा उपप्रमुख रघुनाथ चव्हाण, तालुका प्रमुख किशोर अग्रवाल,सुदर्शन अग्रवाल, शहर प्रमुख मछिंद्र घाडगे, राजेंद्र क्षीरसाठ, प्रवीण मिरकर, रवी रासने, पंकज जायसवाल, शिवा टोम्पे, कैलास वराडे, संजय बड़क, गोपाल मंडावत, आशीष कुलकर्णी, शिवा गौर, महेंद्र बावस्कर, सरदासिंग राजपूत, सहित मोठ्या संखेने कार्यकर्ते हजर होते.
सिल्लोड येथे शिवसेनेचा दीड तास रास्ता रोको
By admin | Updated: June 16, 2017 19:59 IST