औरंगाबाद : गेल्या वर्षभरात कलर्स चॅनल आणि लोकमत सखी मंचद्वारे अनेक कार्यक्रमांची शृंखला संपूर्ण महाराष्ट्रात आणि गोव्यात यशस्वीरीत्या राबविली गेली. अनेक उल्लेखनीय कार्यक्रम याअंतर्गत घेतले गेले. याच शृंखलेत परत एकदा कलर्स चॅनल लोकमत सखी मंच सदस्यांसाठी ‘सखीज् गॉट टॅलेंट’ हा उपक्रम घेऊन येत आहे. दि.३० एप्रिल लोकमत लॉन, लोकमत भवन येथे सायं. ६ वाजता होणार आहे.स्त्रियांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून लोकमत सखी मंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात रुजलेय तसेच कलर्स चॅनलनेदेखील आपल्या नावीन्यपूर्ण आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या कौटुंबिक मालिका आणि इतरही कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर स्वतंत्र पकड निर्माण केली आहे आणि म्हणून संयुक्तरीत्या राबविलेले प्रत्येक कार्यक्रम यशस्वी झाले आहेत. यात पुन्हा सखींच्या कलागुणांना वाव देणारा ‘सखीज् गॉट टॅलेंट’ हा कार्यक्रम म्हणजे कलाकारांसाठी सुवर्णसंधीच आहे. प्रत्येक महिलेला निसर्गाने काही तरी देणगी दिलेली असते. या कलेचे प्रदर्शन तिला करता यावे, आपली कला मंचावर मोठ्या आत्मविश्वासाने सादर करता यावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायन, नृत्य आणि कुठलीही कला अवगत असलेल्या महिलांना यात भाग घेता येईल. यामध्ये १. गायन, २. नृत्य, ३. अन्य कुठलीही कला असे ३ प्रकारात विभाजन करण्यात आले आहे. या तीन कॅटेगरी केल्या असून प्रथम येणाऱ्या स्पर्धकास प्राधान्य दिले जाईल. यातून ठरतील सखी गॉट टॅलेंटच्या ३ विजेत्या सखी. कलर्स चॅनलने अशा कार्यक्रमांचे आयोजन महिलांसाठी तर केलेलेच आहे; पण आपल्या टीव्ही दर्शकांसाठीही येत्या ३० एप्रिलपासून रात्री ९ वा. प्रत्येक शनिवार- रविवारी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमामध्ये केवळ क लेला प्राधान्य देण्यात आले आहे. कलर्स चॅनलने इंडियाज गॉट टॅलेंट हा मंच कलाकारांना उपलब्ध करून दिला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री किरण खेर, ख्यातनाम दिग्दर्शक करण जोहर, नृत्यनिपुण मलाईका अरोरा यांच्या अनुभवी परीक्षणातून सर्व कलाकार तावून सुलाखून बाहेर निघणार आहेत आणि मग ठरणार आहे इंडियाज गॉट टॅलेंटचा जगज्जेता कलाकार. जगभरातील कलाकार कलर्स चॅनलच्या पडद्यावर व गोवा आणि महाराष्ट्रातील महिला कलाकार लोकमतच्या मंचावर आपल्या टॅलेंटची जादू दाखविणार आहेत. सखींसाठी खास आकर्षण नृत्याचा अनोखा कार्यक्रम तसेच माधुरी अवीट यांचे बासरी वादन. या स्पर्धकांव्यतिरिक्त इतरही मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानी तमाम रसिकांना मिळणार हे नक्की. कार्यक्रम बघण्याकरिता सर्व सखी मंच सदस्य आमंत्रित. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. स्पर्धा नि:शुल्क असून अगोदरच नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ९८५०४०६०१७ वर सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत साधावा.
क लर्स आणि लोकमत सखी मंच प्रस्तुत सखीज् गॉट टॅलेंट
By admin | Updated: April 27, 2016 00:29 IST