गजानन वानखडे , जालनायेत्या खरिप हंगामासाठी जिल्ह्यातील अपेक्षीत पेरणीचे क्षेत्र आणि बियाणे किटक नाशके व खतांचा पुरवठ्याचा आराखडा कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. त्यानूसार जिल्हात ४४ हजार ७०९ क्टिटंल बियाणे आणि १ लाख ६० हजार ४०० मेट्रीक टन खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या वर्षीचा खरिप हंगाम सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहीला आहे.या पृष्ठभूमीवर खरिप हंगामाची पूर्व तयारी म्हणून जिल्हा परिषद कृषी विभाग आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील अपेक्षीत पेरणीचे क्षेत्र, पेरणीसाठी मागणीनूसार शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते व किटकनाशकाचा पुरवठाबाबत आराखडा तयार करण्यात आला त्यानूसार जिल्ह्यात सरासरी ५ लाख ६१ हजार ३६० हेक्टरवर खरिप पेरणी असून, त्या तुलनेत या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्हात ६ लाख ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी प्रस्तावित आहे.खरीप पेरणीसाठी जिल्ह्यात ४४ हजार ७०९ क्टिटंल बियाणांची गरज प्रस्तावित करण्यात आली आहे.यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूंग, उडीद, भुईमुंग, इत्यादी बियाण्यांचा समावेश आहे. तसेच खरिप हंगामात जिल्ह्यातील आणि तालुक्यात १ लाख ६० हजार ४०० मेट्रीक टन विविध खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यंदा तरी मान्सून चांगला बरसावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची जुळवा जुळव सुरु केली असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येते. खरिप हंगामात बियाणे आणि खताचा गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुका स्तरावर आठ असे नऊ भरारी पथकाची कृषी विभागाच्या वतीने भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.बियाणे व खताची उपलंब्धता आणि नियंत्रण ठेवण्याचे काम या पथकाकडून करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सध्या जिल्ह्याला २२ हजार ९५३ क्टिंटल सोयाबिन बियाणाची आवश्यक आहे. परंतु जिल्ह्याला महाबिजकडून फक्त ४ हजार ७६५ क्टिंटल बियाणे उपलंब्ध झाले आहे. सोयाबिनचे बियाणे कमी पडू नये यासाठी शेतकऱ्याकडील बियाणे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बैठका सुरू असल्याचे कृषी अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
खरीप हंगामासाठी आराखडा सादर
By admin | Updated: May 12, 2015 00:49 IST