हिंगोली : मग्रारोहयोत कामे करणार्या यंत्रणांना सततच्या तपासण्यांमुळे चांगलाच घाम फुटला. दुष्काळी परिस्थितीमुळे मजूर उपस्थिती वाढण्याऐवजी ती घटत चालली आहे. डिसेंबरच्या दुसर्या आठवड्यात ग्रामपंचायतींची ३२ कामे सुरू होती. तर इतर यंत्रणांची ११३ कामे सुरू होती. यात हिंगोली तालुक्यातील मजूर उपस्थिती ९५४४ पर्यंत गेली होती. तर कळमनुरी-२३४, सेनगाव-२८३, वसमत-८, औंढा- ५२७ अशी उपस्थिती होती. मात्र त्यानंतरच्या आठवड्यात ती हळूहळू कमी होत गेली आता काही तालुक्यांत तर कामेच सुरू नसल्यासारखी स्थिती आहे. त्यातही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मजुरांचा हा आकडा अडीच हजारांपर्यंत खाली घसरला होता. यात पुन्हा हिंगोली पंचायत समितीच आघाडीवर आहे. या तालुक्यात १२८३ मजूर यंत्रणांसह कामावर आहेत. त्यानंतर औंढा तालुक्यात ८४५, वसमत-७८, सेनगाव-८१, कळमनुरी-४0५ अशी संख्या आहे. जिल्हा स्तरावरील प्रशासन या कामांवर नजर ठेवून आहे. थेट कारवाईचा फास आवळला जात आहे. त्यामुळे बोगस मजूरही घटले. /(जिल्हा प्रतिनिधी)
कारवाईच्या दणक्याने मजूर उपस्थिती घटली
By admin | Updated: January 6, 2015 11:50 IST