शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात ‘झेप’ घेण्याची तयारी; छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळाला आता आठ प्रवेशद्वारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:45 IST

काम वेगात, आता ‘इमिग्रेशन’कडे डोळे : ६ ‘डिपार्चर गेट’, एक ‘इंटरनॅशनल अरायव्हल गेट’ अन् एक ‘डोमॅस्टिक अरायव्हल गेट’

छत्रपती संभाजीनगर : परदेशात झेप घेण्यासाठी म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जय्यत तयारी केली जात आहे. विमानतळाच्या इमारतीत आजघडीला प्रवाशांसाठी ‘डिपार्चर’ आणि ‘अरायव्हल’ असे दोनच गेट आहेत. मात्र, सध्या ८ प्रवेशद्वारांचे काम हाती घेण्यात आले आहे. यात ६ ‘डिपार्चर गेट’, एक ‘इंटरनॅशनल अरायव्हल गेट’ अन् एक ‘डोमॅस्टिक अरायव्हल गेट’ असणार आहेत. एकीकडे इमारत सज्ज होत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी आवश्यक ‘इमिग्रेशन’ सुविधा कधी मिळते, याकडे डोळे लागले आहेत.

चिकलठाणा विमानतळावर सध्या सुरू असलेले प्रवेशद्वाराचे काम पाहून, ये-जा प्रवाशांना सुखद धक्का बसत आहे. विमानतळाचे रूपडे पालटून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल, अशी आशा प्रवाशांना आहे. विमानतळाच्या इमारतीत एक, दोन नव्हे तर ८ प्रवेशद्वारे साकारण्यात येत आहेत. यातील ६ प्रवेशद्वारे ही विमानतळावरून विविध शहरांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी असेल. तर दोन प्रवेशद्वार हे शहरात दाखल होणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी असेल. यातील एक प्रवेशद्वार फक्त आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी असणार आहे.

पहिले आंतरराष्ट्रीय विमान कधी?शहरातून ऑक्टोबरपासून एअर एशिया एअरलाइन्सकडून बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, इमिग्रेशन सुविधेसाठी मनुष्यबळाची प्रतीक्षाच आहे. हे मनुष्यबळ मिळाल्यानंतर विमानसेवेची तयारी करायला एअर एशिया एअरलाइन्सला तीन महिने लागतील. जोपर्यंत इमिग्रेशन चेक पोस्ट (आयसीपी) सुरू होत नाही, तोपर्यंत कोणतीही विमान कंपनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करू शकत नाही. इमिग्रेशन काऊंटरचीही विमानतळावर तयारी झाली आहे. फक्त मनुष्यबळाची प्रतीक्षा आहे. नव्या वर्षात बँकाॅकसाठी विमानसेवा कधी सुरू होईल, याकडे प्रवाशांचे लक्ष आहे.

टप्प्याटप्प्यात प्रवेशद्वारे सुरू होणारया ८ प्रवेशद्वारांना ‘व्हेस्टिब्युल’ असे म्हटले जाते. यात ६ ‘डिपार्चर गेट’, एक ‘इंटरनॅशनल अरायव्हल गेट’ आणि एक ‘डोमॅस्टिक अरायव्हल गेट’ असतील. ही प्रवेशद्वारे टप्प्याटप्प्याने सुरू होतील.-शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन