शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महामॅरेथॉनसाठी चीन आणि तैवान येथील धावपटूंचीही तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : लोकमत औरंगाबाद महामॅरेथॉन स्पर्धा जसजशी जवळ येत आहे तसतसा धावपटंूमध्ये नवा उत्साह संचारत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकमत औरंगाबाद महामॅरेथॉन स्पर्धा जसजशी जवळ येत आहे तसतसा धावपटंूमध्ये नवा उत्साह संचारत आहे. तीन आठवड्यांवर आलेल्या या स्पर्धेची ‘क्रेझ’ एवढी आहे की, केवळ स्थानिक धावपटूंनाच नाही, तर परदेशी पाहुण्यांनादेखील महामॅरेथॉनचे वेध लागले आहेत. सध्या शहरात वास्तव्यास असलेल्या दोन चिनी व एक तैवानी धावपटूंनी नुकताच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली.चीनचे जिआंजून वेई (५०) व वँग्यान पेंग (४५) आणि तैवानचे चाओचीन हुआंग (३२) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे विदेशी पाहुणे शहरातील एका कंपनीमध्ये कार्यरत आहेत.विशेष म्हणजे हे तिघे काही सराईत धावपटू नाहीत; परंतु गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लोकमत औरंगाबाद महामॅरेथॉनची उत्साहपूर्ण चर्चा ऐकून त्यांना यामध्ये सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. हजारोंच्या संख्येने लोक एकत्र धावणार म्हटल्यावर जोश आणि जल्लोष काही निराळाच असणार यात काही शंकानाही.‘लोकमत’शी बोलताना चाओचीन हुआंग म्हणाले की, ‘लोकमत महामॅरेथॉनसारख्या भव्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मला विश्वास आहे की, आम्हा सगळ्यांना खूप मजा येणार आहे.’ जिआंजुन आणि वँग्यान यांनीही हुआंगप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्तकेली.ते म्हणाले, ‘आता आम्हाला १७ डिसेंबरची प्रतीक्षा आहे. त्या दिवशी आम्ही अत्यंत मनमोकळेपणाने स्पर्धेचा आनंद लुटणारआहोत.यानिमित्त नवे मित्रही जोडले जातील. वेगाने किंवा हळू धावू; पण आम्ही स्पर्धा पूर्ण करणार. आयुष्यभर स्मरणात राहील, असा हा दिवस ठरेल, अशी आशा आहे.’