शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी वेगात

By admin | Updated: August 27, 2014 23:39 IST

हिंगोली : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पांच्या आगमनाची तयारी पंधरवड्यापासून जोरात सुरू आहे.

हिंगोली : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पांच्या आगमनाची तयारी पंधरवड्यापासून जोरात सुरू आहे. हिंगोली शहरात जवळपास लहानमोठ्या मंडळांनी मखरापासून सजावटीपर्यंतची उभारणी केली. गुरूवारपर्यंत शहरातील ३५ मंडळांनी परवाना घेतला आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत गणरायाचा भक्तगण मोठा आहे. शहरच नव्हे तर वस्तीतांड्यावरही अगदी थाटामाटात मूर्तीची स्थापना केली जाते. शहरात या उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त होते. हे पाहता पावसाळ्याच्या प्रारंभापासून गणेश मूर्तीची उभारणी कारागीरांकडून सुरू आहे. हिंगोलीत मोजके पाच ते सहा मूर्तीकार मागील तीन महिन्यांपासून मेहनत घेत होते. नुकताच त्यांनी मूर्तीवर शेवटचा हात फिरवला. आता सर्वत्र बाजारात लहान-मोठ्या मूर्ती आल्या आहेत. साधारण ५०० रूपयांपासून २० हजार रूपयांच्या मूर्ती पाहवयास मिळतात. यंदा भाव वधारले तरी विराट मूर्ती घेण्याकडे प्रत्येक मंडळाचा कल असतो. अशा मूर्ती घेणाऱ्या मंडळांची संख्या जवळपास ३० असून एकूण ८० ते ९० मंडळांकडून मूर्तीची स्थापना केली जाते. बुधवारपर्यंत ३५ मंडळांनी शहर ठाण्यात नोंदणी केली होती. पदाधिकाऱ्यांकडून भक्तांसाठी व्यवस्था, विद्युत रोषणाई टाकणे, मखर उभारणी, देखावे तयार करणे, सजावट, शिखर उभारणीसाठी दोन आठवड्यापासून मेहनत घेत आहेत. सामाजिक उपक्रमांची आखणी काही मंडळांनी केली आहे. मंडळांकडून बेटी बचाओ, गोमाता रक्षण, झाडे लावा झाडे जगवा आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)एक गाव, एक गणपतीजिल्ह्यात गतवर्षी ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना सव्वा तीनशे गावांत झाली होती. अद्याप एकही नोंदणी पोलिसात झालेली नाही. गावात वितुष्ट वाढणार नाही म्हणून पोलिसांकडून तंटामुक्त गाव समित्यांना यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार तंटामुक्ती समित्यांकडून कामही सुरू असून त्याला किती प्रतिसाद मिळतो, ते येत्या दोन दिवसांत समजणार आहे.