लातूर : लातूर अर्बन को-आॅपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्षपदी प्रदीप राठी तर उपाध्यक्षपदी आदिनाथ सांगवे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली़ बँकेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी अशोक कदम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वि़म़ गोरफळकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली़ अध्यक्ष पदासाठी प्रदीप रामगोपाल राठी यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी आदिनाथ बसवंतप्पा सांगवे यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची निवड बिनविरोध जाहीर केली. अध्यक्ष व उपाध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्याचे कळताच लातूर शहरातील अनेकांनी प्रदीप राठी व आदिनाथ सांगवे यांची भेट घेवून सत्कार केला़ यावेळी त्यांनी पदभार घेतला़ बैठकीला संचालक भीमाशंकर देवणीकर, रामबिलास लोया, विठ्ठलराव चित्ते, शरणाप्पा स्वामी कलेमले, सुरेंद्र पाठक, महमद शेख, दिलीप माने, व्यंकट गर्जे, प्रेमचंद बियाणी (औराद), जुगलकिशोर झंवर, चंद्रप्रकाश भन्साळी (औरंगाबाद), दीपक मालीवाल (नांदेड), कविता चक्रवर्ती (पुणे), प्रदीप बेद्रे (उदगीर), रत्नमाला अंभोरे, विकास धोत्रे व शुभदा रेड्डी यांची उपस्थिती होती.
लातूर अर्बन बँकेच्या चेअरमनपदी प्रदीप राठी
By admin | Updated: May 1, 2015 00:50 IST