शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

पीपीई कीट, मास्कमुळे आरोग्य कर्मचारी देताहेत आजारांना तोंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:27 IST

पीपीई कीट वापरल्याने अचानक चक्कर, डिहायड्रेशन

ठळक मुद्देडॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा रोज ६ तास वापर परिणामांकडे दुर्लक्ष करून कोरोनाविरुद्ध लढा

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : गेल्या ७ महिन्यांपासून डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी अविरतपणे कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. उपचारातून शेकडो रुग्णांना त्यांनी कोरोनामुक्त केले. मात्र, या लढ्यात रोज किमान ६ तास पीपीई कीट, मास्क वापरावा लागतो. त्यादरम्यान पाणीही पिता येत नाही, लघुशंकेला जाता येत नाही. त्यातून अचानक चक्कर येणे,  डिहायड्रेशन, किडनीवर परिणाम अशा समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.

औरंगाबादेत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. गेल्या ७ महिन्यांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजारांवर गेली. यातील ३५ हजारांवर रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषद, मनपा, घाटी, जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर, कर्मचारी २४ तास कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. उपचार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या प्रारंभी पीपीई कीट घालून उपचार करणे ही बाब सर्वांसाठी नवीन होती. शिवाय कोरोनाची सुरुवात ऐन उन्हाळ्यात झाली. त्यामुळे सुरुवातील हे कीट घालून उपचार करताना डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. घामाघूम होत उपचाराची कसरत करावी लागली. ही कसरत अजूनही सुरूच आहे. पीपीई कीट, मास्क घालून ६ ते ८ तास कर्तव्य बजावताना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मास्कमुळे श्वसनावर परिणाम होतो. तरीही रुग्णसेवेत कोणताही फरक पडणार नाही, याची काळजी आरोग्य कर्मचारी घेताना दिसतात. 

पीपीई कीट वापरल्याने अचानक चक्कर, डिहायड्रेशनआयसीयूमध्ये किमान ६ तास कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे एकदा याठिकाणी गेल्यानंतर किमान ६ तास  पीपीई कीट, मास्क काढता येत नाही. त्यामुळे  पाणीही पिता येत नाही. त्यातूून अचानक चक्कर येणे, डिहायड्रेशनच्या समस्यांना आरोग्य कर्मचारी सामोरे जात आहेत. पीपीई कीट परिधान केल्यानंतर लघुशंकेलाही जाता येत नाही. त्यामुळे याचाही सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. परिणामी, त्यातूनही शारीरिक आजारांना आमंत्रण मिळण्याचा धोका बळावत आहे.रुग्णसेवा देताना पीपीई कीटमुळे ६ ते ८ तास पाणी पिता येत नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांना अचानक चक्कर येण्याचे प्रकार झाल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब तिडके म्हणाले.

कर्तव्यानंतर व्हावे लागते क्वारंटाईनघाटीतील निवासी डॉक्टरांना १४ दिवस रुग्णसेवा दिल्यानंतर पुढील ७ दिवस क्वारंटाईन व्हावे लागते. तर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कर्तव्य दिले जात आहे.

कुटुंबापासून दूर राहण्याची वेळकोरोना रुग्णांवर उपचार देत असल्याने डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आपल्यामुळे कुटुंबातील सदस्यांपासून काहीसे दूर राहत आहेत. अनेकांनी तात्पुरत्या स्वरूपात किरायाच्या घरात राहणे पसंत केले आहे. तर काहींनी घरातच वेगळे राहण्याची व्यवस्था केली आहे. अशावेळी मोबाईलवरून संवाद, व्हिडिओ कॉलिंगद्वारे कुटुंबाबरोबर संवाद साधला जातो. 

रोटेशननुसार कर्तव्य दिले जातेडॉक्टर, कर्मचाऱ्यांना रोटेशननुसार कर्तव्य दिले जाते. दोन कर्तव्यांत मोठे अंतर असते. रुग्णांचा राऊंड घेताना पीपीई कीट वापरण्यास प्राधान्य दिले जाते.  पूर्वीच्या तुलनेतील सध्याचे पीपीई कीट अतिशय चांगले आहे. त्यामुळे त्यांचा काहीही त्रास होत नाही. सतत मास्कचा वापर केल्याने कोणताही परिणाम होत नाही. - डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर