शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायतीमधील सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे मातब्बरांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 16:17 IST

वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, वळदगाव, पाटोदा, पंढरपूर आदी ग्रामपंचायतींचा कार्यकाल मार्च-एप्रिल महिन्यात संपलेला आहे.

ठळक मुद्देवाळूज महानगरातील राजकारण तापणारसक्षम ग्रामपंचायत ताब्यात घेण्याची तयारी

वाळूज महानगर : निवडणूक विभागाच्या वतीने मुदत संपलेल्या जिल्हाभरातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ८ डिसेंबरला आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. वाळूज महानगरातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण काय निघते, याकडे मातब्बर राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, वळदगाव, पाटोदा, पंढरपूर आदी ग्रामपंचायतींचा कार्यकाल मार्च-एप्रिल महिन्यात संपलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेण्याचे स्वप्न बघणाऱ्या मातब्बर राजकीय पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला होता. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर शासनाच्या वतीने प्रशासकांच्या नियुक्त्या करण्यात आल्यामुळे निवडणुका केव्हा होणार, असा प्रश्न राजकीय पदाधिकाऱ्यांना पडला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मार्च-एप्रिल महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत ८ डिसेंबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वाळूज महानगरातील अर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना, भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या या ग्रामपंचायतींना कारखानदारांकडून दरवर्षी मोठा कर मिळत असल्यामुळे या ग्रामपंचायतींवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांत चढाओढ सुरू असते. या श्रीमंत ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी पदाधिकारी ताकदीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असतात.

गत पंचवार्षिक निवडणुकीत अशी होती स्थितीगत पंचवार्षिक निवडणुकीत वाळूज, जोगेश्वरी, रांजणगाव या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद एससी प्रवर्गासाठी आरक्षित होते. तर पंढरपूर, वळदगाव, पाटोदा या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBeedबीडsarpanchसरपंच