शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

लॉकडाऊनमुळे औरंगाबादवर दीर्घकालीन परिणामाची शक्यता; आढावा घेऊन पुनर्विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 19:41 IST

उद्योगपती रिषी बागला यांची लॉकडाऊनचा दोन दिवसांत आढावा घेऊन प्रशासनाने पुनर्विचार करण्याची मागणी

ठळक मुद्दे कचरा, पाणी यासारख्या कारणांनी आधीच औरंगाबादची बदनामी झाली आहे.कोविडच्या पार्श्वभूमीवर इथले प्रशासन नियंत्रण मिळवण्यात अपयशी १४४ कलम लागू करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत.

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये दोन-तीन दिवसांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयाची खरोखर गरज आहे का, याचा प्रशासनाने विचार करावा, अन्यथा औरंगाबादच्या उद्योगांवर याचा दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भीती उद्योजक रिषी बागला यांनी व्यक्त केली. 

औरंगाबादेत शुक्रवारपासून पुन्हा नऊ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना उद्योजक रिषी बागला यांनी इथल्या उद्योग क्षेत्राबाबत होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, प्रशासन चुकीचा निर्णय घेत नाही, हे मान्य आहे; परंतु या निर्णयामुळे औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. येथील अनेक उद्योग सिंगल सोर्सच्या माध्यमातून देश-विदेशातील उद्योगांना माल पुरवठा करीत आहेत. या लॉकडाऊनमुळे येथील उद्योग बंद राहतील व देश-विदेशात माल पुरवठा करण्याची चेन खंडित होईल. त्याची मोठी किंमत इथल्या उद्योगांना चुकवावी लागेल. याचा परिणाम येथील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर किती प्रमाणात होईल, किती उद्योग बंद पडतील, इथले काही उद्योग दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार करतील का, लोकांचा औरंगाबाद शहरावरील विश्वास कमी होईल का, ही वेळच सांगेल. 

ते म्हणाले, कचरा, पाणी यासारख्या कारणांनी आधीच औरंगाबादची बदनामी झाली आहे. आता कोविडच्या पार्श्वभूमीवर इथले प्रशासन नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले, हा संदेश जागतिक स्तरावर गेला तर येथील आॅरिक सिटी किंवा औद्योगिक वसाहतींवर काय परिणाम होऊ शकतो, ते पाहावे लागेल.  अजूनही प्रशासनाने दोन-तीन दिवसांत परिस्थितीचा आढावा घ्यावा. १४४ कलम लागू करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत. यामुळे व्यवहार सुरळीत चालतील, अर्थचक्र पूर्वपदावर येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा बागला यांनी व्यक्त केली. 

संपूर्ण अर्थचक्र थांबेल : जिल्ह्याची २० लाख लोकसंख्या गृहीत धरली, तर सध्या ६ हजार लोक कोरोनाबाधित झाले आहेत. म्हणजे, ०.३ टक्के लोक प्रभावित झालेले असून, ९९.७ टक्के लोक अजूनही कोरोनापासून दूर आहेत. या ०.३ टक्के संसर्ग झालेल्या लोकांसाठी संपूर्ण औरंगाबादकरांना वेठीस धरले आहे, ही विचार करायला लावणारी बाब आहे. यामुळे संपूर्ण अर्थचक्र थांबणार आहे. लॉकडाऊनपेक्षा अन्य काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते, असे बागला म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी