शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग ; औरंगाबादेत प्राध्यापकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:20 IST

विद्यार्थिनीच्या व्हॉटस् अ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवून चॅटिंग करणाºया एका प्राध्यापकाला विद्यार्थिनीच्या भावाने काळे फासले. गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही खळबळजनक घटना शहरातील स. भु. वाणिज्य महाविद्यालयात घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देविद्यार्थिनीच्या भावाने केला पर्दाफाश : स. भु. वाणिज्य महाविद्यालयात जाऊन प्राध्यापकाला दाखविला इंगा; कॉल करण्यासाठी आणत होता दबाव

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विद्यार्थिनीच्या व्हॉटस् अ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवून चॅटिंग करणाºया एका प्राध्यापकाला विद्यार्थिनीच्या भावाने काळे फासले. गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही खळबळजनक घटना शहरातील स. भु. वाणिज्य महाविद्यालयात घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला बेड्या ठोकल्या.प्रा. मनोज बद्रीनारायण जयस्वाल (३८, रा. काचीवाडा, मूळ रा. पानवडोद, ता. सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे. क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले की, छावणीतील रहिवासी तरुणी ही स. भु. महाविद्यालयात बारावीला शिकते. आरोपी मनोज जयस्वाल हा अकाऊंट विषय शिकवतो. गेल्या काही दिवसांपासून त्याची या विद्यार्थिनीवर वाईट नजर आहे. तो सारखं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने तिचा मोबाईल नंबर मिळविला. तेव्हापासून तो तिच्या व्हॉटस् अ‍ॅपवर मेसेज पाठवू लागला. सुरुवातीला अभ्यासाविषयी तो चॅटिंग करीत असे. नंतर मात्र तो खरे रूप दाखवू लागला. तो अश्लील मेसेज पाठवू लागला. ती दाद देत नसल्याने तो ब्लॅकमेल करू लागला. तिने चॅटिंग करावे, तिने त्यास व्हिडिओ कॉलिंग करावे, यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत असे. अकाऊंटसारख्या महत्त्वाच्या विषयाचा तो प्राध्यापक असल्याने ती त्याचे हे उपद्व्याप सहन करीत होती. काही दिवसांपूर्वी तर त्याने तिला व्हिडिओ कॉलिंग करून विवस्त्र होण्यास सांगितले. तिने मात्र त्यास दाद दिली नाही आणि फोन बंद केला. पीडितेच्या भावाला ही बाब समजताच सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याने आणि त्याच्या मित्राने स. भु. कॉलेज गाठले. प्राध्यापकांच्या रूममध्ये मनोज जयस्वाल बसलेला होता. त्यांनी तेथेच त्याच्या तोंडाला काळे फासले. ही घटना समजताच क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अकमल शेख, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव आणि दामिनी पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि प्रा. मनोजला ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.