शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सिडको नाट्यगृहाचे पीओपी छत कोसळले; दोन महिला बचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:35 IST

सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिराच्या व्हरांड्यातील पीओपीचे छत शुक्रवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. छत कोसळत असताना काही अंतरावरच असणाऱ्या दोन महिला बालंबाल बचावल्या.

ठळक मुद्देऔरंगाबाद मनपाचे दुर्लक्ष : धोकादायक छत काढण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिराच्या व्हरांड्यातील पीओपीचे छत शुक्रवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. छत कोसळत असताना काही अंतरावरच असणाऱ्या दोन महिला बालंबाल बचावल्या.म्हाडाच्या सदनिकांच्या सोडतीचा कार्यक्रम नाट्यमंदिरात चालू होता. लाभार्थींच्या नावाची यादी व्हरांड्यात लावण्यात आली होती. ही यादी पाहण्यासाठी नागरिकांची व्हरांड्यात गर्दी झाली होती. व्हरांड्यात काही टेबल, खुर्च्याही मांडण्यात आल्या होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास व्हरांड्यातील पीओपीचे छत अचानक कोसळले. छताला असलेला लोखंडी बार आणि घट्ट झालेले प्लास्टिक आॅफ पॅरीस खाली आले. छत कोसळल्याच्या ठिकाणापासून अगदी दोन ते तीन मीटरच्या अंतरावर एका टेबलसमोर दोन महिला कागदपत्रे भरून घेण्यासाठी उभ्या होत्या. छत कोसळल्याचा आवाज ऐकून त्या बाजूला धावल्या. त्यामुळे त्यांना इजा झाली नाही. छत कोसळ्ल्याचा आवाज ऐकून नाट्यगृहाच्या आतील नागरिकही बाहेर आले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी नाट्यगृहातील आणि व्हरांड्यातील छताची पाहणी करून मनपाच्या अभियंत्याला बोलावून घेतले. या छताची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून त्वरित अहवाल द्यावा, तसेच छत धोकादायक बनले असल्यास ते काढून टाकण्याची सूचनादेखील त्यांनी यावेळी केली.नाट्यगृहातील छत पडल्याची रीतसर नोंद घेऊन त्याची एक तक्रारदेखील स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याच्या सूचना मनपाच्या वॉर्ड अभियंत्याला देण्यात आल्या.म्हाडाच्या अधिकाºयांनी केल्या तक्रारीनाट्यगृहाची अवस्था वाईट झाली असून, धोकादायक छत पडण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. अनेकदा या घटना घडल्या असतानादेखील त्याकडे अधिकाºयांनी दुर्लक्ष का करावे. गर्दीत छत कोसळले असते तर मोठा अनर्थ झाला असता. म्हाडाच्या सोडतीला वेगळेच वळण लागले असते, अशी भीती अधिकाºयांनी व्यक्त केली.दुरुस्तीची मागणीनाट्यगृह निर्माणापासून मनपाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने नाट्यगृहाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. सिडको परिसरात एकमेव हे मोठे नाट्यगृह असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcidcoसिडको