‘जमात-ए इस्लामी हिंद’ सिल्लोड शाखेच्या वतीने ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या दहा दिवसीय अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात ते बोलत होते. मोहम्मद साकीब मोहम्मद साजिद यांच्या कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सिल्लोड जमात ए इस्लामीचे शहराध्यक्ष डॉ. शकील खान यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाची रूपरेषा व जमात ए इस्लामीचा परिचय करून दिला. यावेळी दीपक अग्रवाल यांचे भाषण झाले. मोहम्मद साजिद यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला सर्व समाजाचे तसेच सर्व पक्षांचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
(फोटो) सिल्लोड येथे आयोजित ‘अंधारातून प्रकाशाकडे’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जमात ए इस्लामीचे शहराध्यक्ष डॉ. शकील खान, डॉ. रफिक पारनेरकर, मोहम्मद साकीब मोहम्मद साजिद, आदी.