शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

ओटीटी सेन्सॉरशिपच्या हेतूवर पूजा भटला संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:02 IST

अभिनेत्री पूजा भटने नुकतेच एका मुलाखतीत ओटीटी सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावर मत मांडले आहे. तिच्या मते, एक दिग्दर्शक आपल्या चित्रपट वा ...

अभिनेत्री पूजा भटने नुकतेच एका मुलाखतीत ओटीटी सेन्सॉरशिपच्या मुद्द्यावर मत मांडले आहे. तिच्या मते, एक दिग्दर्शक आपल्या चित्रपट वा सीरिजद्वारे एक संदेश लोकांना देऊ इच्छितो. त्यावरही कायदे-नियम थोपले जातात. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सेन्सॉर बोर्ड असते. काय दाखवले पाहिजे, हे ते बोर्ड सांगत असते. माझ्यापुरते सांगायचे झाल्यास, मला योग्य वाटते, ते मी दाखवेलच आणि यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढावे लागले तरी लढेन. फिल्ममेकर्सला त्यांची कथा त्यांच्या पद्धतीने मांडण्यापासून रोखणे, हाच सरकारचा हेतू आहे,’ दरम्यान, ती लवकरच ‘बॉम्बे बेगम्स’ या सीरिजद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करतेय.

आमच्या हेटर्सला खूप साऱ्या शुभेच्छा

आयकर विभागाच्या धाडसत्रानंतर अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. धाडसत्रानंतर तापसीने ट्विट करत, टीकाकारांना सणसणीत उत्तर दिले होते. आता अनुराग कश्यप यानेही हेटर्सला आपल्या खास शैलीत सुनावले आहे. अनुरागने तापसी पन्नूसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.‘... आणि आम्ही #DoBaaraa सुरुवात करतोय. आमच्या हेटर्सला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, ’ असे उपरोधिक कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे. तापसी व अनुरागचा हा फोटो ‘दोबारा’ या चित्रपटाच्या सेटवरचा आहे.

लग्नासाठी स्वरा भास्कर तयार

नुकताच अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियात तिचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘लग्नासाठी मुलगा हवा आहे’ अशा आशयाची एक पोस्ट लिहिली आहे. ‘अरेंज मॅरेजसाठी हा फोटो. या फोटोत दिसणाऱ्या मुलीला स्वयंपाक येत नाही, चहा कधी कधी चांगला करता येतो…तिच्यासोबत एक कुत्रा आहे. ती त्या कुत्र्याला तिचा मुलगा समजते. कधी कधी तिच्या डोक्यात बंडखोरीचे विषय येतात, आंदोलनजीवी आणि देशद्रोही असल्याचा तिच्यावर आरोप आहे… चांगल्या घरची सून होण्यासाठी उत्तम मुलगी’ या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे.