शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

परंडा तालुक्याला ‘फ्लोराईड’चा धोका !

By admin | Updated: February 5, 2015 00:54 IST

उस्मानाबाद : जिल्हाभरातील ५ हजार ८७५ पैकी २ हजार ८८२ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात आली असता सुमारे साडेसातशे स्त्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य आहे.

उस्मानाबाद : जिल्हाभरातील ५ हजार ८७५ पैकी २ हजार ८८२ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात आली असता सुमारे साडेसातशे स्त्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. यापैकी परंडा तालुक्यातील सर्वाधिक १०२ जलस्त्रोतांमध्ये ‘फ्लोराईड’ आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित स्त्रोतांचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.जिल्हा पाणी स्वच्छता कक्षांतर्गत पाणी गुणवत्ता विभागाच्या माध्यमातून रासायनिक तपासणी अभियान सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून डिसेंबर २०१४ ते जोनवारी २०१५ या कालावधीत जिल्हाभरातील किमान ५ हजार ८७५ स्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करणे अपेक्षित होते. परंतु, पन्नास टक्क्यांच्या आसपास स्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे २ हजार ८८२ नमुन्यांचीच तपासणी होवू शकली. यापैकी ७४३ स्त्रोतांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळांनी संबंधित कक्षाला सादर केला आहे. यामध्ये उस्मानाबाद-तुळजापूर तालुक्यातील ३३९, परंडा-भूम तालुक्यातील ३२३, उमरगा-लोहारा तालुक्यातील ७६ आणि वाशी-कळंब तालुक्यातील पाच स्त्रोतांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हभरात १४४ स्त्रोतांमध्ये ‘फ्लोराईड’ आढळून आले असता यापैकी १०२ स्त्रोत हे एकट्या परंडा तालुक्यातील आहेत. त्याचप्रमाणे उस्मानाबाद ३६ आणि उमरगा-लोहारा तालुक्यांतील ६ स्त्रोतांमध्ये फ्लोराईड असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उपरोक्त तालुक्यांसाठी ही बाब धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, फ्लोराईडयुक्त पाणी मानवी आरोग्यासाठी घातक असल्याने त्याचा पिण्यासाठी वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश पाणी गुणवत्ता विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. तसेच स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याच्याही सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्याची सोय चार ठिकाणी आहे. त्यानुसार उस्मानाबादच्या प्रयोगशाळेत ९४०, परंडा ८०२, उमरगा ५८३ आणि वाशी येथील प्रयोगशाळेमध्ये ५५७ स्त्रोतांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७४३ स्त्रोतांचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.