शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

धुळे संघाकडून जालना पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:55 IST

धीरज सोनवणे आणि प्रफुल्ल धंगर यांची शतकी खेळी आणि आनंद जगताप याची सुरेख गोलंदाजी या बळावर धुळे संघाने घरच्या मैदानावर आज झालेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत जालना संघावर एक डाव ६२ धावांनी मात केली. जालन्याकडून अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश काणे याने झुंजार अर्धशतक ठोकले.

ठळक मुद्दे१९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा : व्यंकटेश काणेच्या झुंजार ८६ धावा

औरंगाबाद : धीरज सोनवणे आणि प्रफुल्ल धंगर यांची शतकी खेळी आणि आनंद जगताप याची सुरेख गोलंदाजी या बळावर धुळे संघाने घरच्या मैदानावर आज झालेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत जालना संघावर एक डाव ६२ धावांनी मात केली. जालन्याकडून अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश काणे याने झुंजार अर्धशतक ठोकले.धुळे संघाने प्रथम फलंदाजी करीत त्यांचा पहिला डाव ६ बाद ४३२ धावांवर घोषित केला. त्यांच्याकडून धीरज सोनवणे याने सर्वाधिक १७0 चेंडूंत १७ चौकार व ६ षटकारांसह सर्वाधिक १६५ धावा फटकावल्या. प्रफुल्ल धंगर याने १७ चौकारांसह १३१ धावांची खेळी सजवली. सलामीवीर प्रशांत ढोले याने ६५ धावांचे योगदान दिले. जालना संघाकडून रामेश्वर दौड याने ८३ धावांत ३ गडी बाद केले. स्वप्नील पठाडेने २ व झुबेर कुरैशीने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात जालना संघाने ५३.३ षटकांत सर्वबाद २२४ धावा केल्या. जालना संघाकडून प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश काणे याने एकाकी झुंज देताना ५९ चेंडूंतच ९ चौकार व ४ षटकारांसह ८६ धावांची स्फोटक खेळी केली. स्वप्नील पठाडेने ६ चौकारांसह ६३ चेंडूंत ३५ आणि शोएब सय्यदने २९ व शुभम वर्माने २२ धावा केल्या. धुळे संघाकडून लोकेश देशमुख, आनंद जगताप, प्रीतेश पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यानंतर धुळे संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी न करता जालना संघावर फॉलोआॅन लादला. फॉलोआॅननंतर जालन्याचा संघ दुसºया डावात १४६ धावांत गारद झाला. जालना संघाकडून हिंदुराव देशमुखने ४ चौकार व २ षटकारांसह ४५, पहिल्या डावात झुंजार अर्धशतक ठोकणाºया व्यंकटेश काणे याने २७ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ३२ व शुभम वर्माने १९ धावा केल्या. धुळे संघाकडून आनंद जगतापने २७ धावांत ५ गडी बाद केले. गौरव देशमुख व लौकेश देशमुख यांनी प्रत्येकी २, तर सिद्धेश जोशीने १ गडी बाद केला.