शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खैरे-सावे यांच्यात राजकीय हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:59 IST

शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आणि भाजपचे पूर्व मतदारसंघातील आ. अतुल सावे यांच्यात मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. युती असताना एकत्रित नांदणाऱ्या या दोन्ही लोकप्रतिनिधींमधील हे द्वंद्व कशामुळे सुरू आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आणि भाजपचे पूर्व मतदारसंघातील आ. अतुल सावे यांच्यात मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. युती असताना एकत्रित नांदणाऱ्या या दोन्ही लोकप्रतिनिधींमधील हे द्वंद्व कशामुळे सुरू आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.समांतर जलवाहिनी, महापालिकेतील रस्ते अनुदान, राजकीय कार्यक्रमांत नाव न टाक णे, कार्यक्रमला बोलवायचे आणि वाट न पाहता कार्यक्रम आटोपून घ्यायचा. यापासून ते १२ मेच्या दंगलीच्या घटनेसह १५ जूनच्या सिडकोतील हरितपट्टा विकास कार्यक्रम भूमिपूजनापर्यंत राजकीय हल्लाबोल होण्याचे प्रकार घडले आहेत. प्रत्येक व्यासपीठावर या दोघांमध्ये काहीना काही मुद्यांवर बिनसत असल्याचे दिसते आहे.एकमेकांना टोले देणे, राजकीय चिमटे, शालजोडे देण्यामुळे ही जोडगोळी चर्चेत राहण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना, असाही प्रश्न आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच हा सगळा प्रकार सुरू असल्याचे बोलले जातआहे.मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम, डीपीसीच्या बैठकांमध्ये खैरेंना तोंडघशी पाण्यात सावे आघाडीवर आहेत, तर पालिकेच्या कार्यक्रमांसह पक्षाच्या व्यासपीठावर सावे व भाजपवर खैरे तोंडसुख घेत असल्याचेदिसते.गेल्या आठवड्यात सिडको कार्यालयासमोर हरितपट्टा विकासाचे भूमिपूजन सकाळी ११ वा. ठेवले होते. मतदारसंघातील कार्यक्रम असल्यामुळे सावे वेळेवर पोहोचले. कार्यक्रम सुरु न झाल्याने ते निघून गेले. नंतर खा. खैरे दुपारी २ वाजेच्या सुमारास आले. त्यांनी महापौर घोडेले, सभापती राजू वैद्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आटोपून घेतला.आ. सावे यांना हा प्रकार कळताच त्यांनी कार्यक्रम स्थळ गाठून खा. खैरेंसह सर्वांना वरच्या आवाजात सुनावले. माझ्या मतदारसंघातील कार्यक्रमाला मला टाळण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. मी सगळ्यांना बघून घेईन, असा संताप सावेंनीकेला.मी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असताना माझी वाट का पाहिली नाही, असे सावे चिडून बोलले. खैरेंनी सावेंचा संताप लीलया पचवून घेतला. कारण त्यांनी सावेंची वाट न पाहता कार्यक्रम उरकून त्यांचा पुरता अवमान केला होता.अटीतटीच्या वक्तव्याची स्पर्धामहापालिकेतील समांतर जलवाहिनीवरून आॅक्टोबर २०१५ पासून सावे आणि खैरे यांच्यात वाद पेटला आहे. तत्कालीन मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्या अविश्वास ठरावावरून दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा वाद झाला. खा. रावसाहेब दानवे यांच्या चिरंजीवाच्या विवाहसोहळ्यात आ. सावे यांनी खा. खैरे यांना खुर्चीवरून उठविण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये अटीतटीची वक्तव्ये करण्याची स्पर्धा लागली आहे.१२ मे रोजी जुन्या शहरात झालेल्या दंगलीनंतर खा. खैरे यांनी आ. सावे यांच्यावर आरोप केले. सावे घटनास्थळी नव्हतेच, असे ते म्हणाले होते. त्यावर सावे यांनी प्रत्युत्तर देत खैरे यांची स्मृती गेल्याचा टोला लगावला होता. युती होवो अथवा न होवो, खैरेंना चारीमुंड्या चीत करण्याची भाषा भाजपच्या गोटातून सुरू असण्यामागे हे वाददेखील असू शकतात.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAtul Saaveअतुल सावे