औरंगाबाद : सिडकोतील एन-११ भागात पोलिओ झालेला रुग्ण आढळल्याची अफवा पसरल्यामुळे आरोग्य विभागाची धावपळ झाली, शिवाय आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली. शहरातील जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर्स आणि मनपाच्या डॉक्टर्सने संबंधित रुग्णाकडे धाव घेतली. ही गंभीर बाब असून, तो रुग्ण पीएफचा असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे.मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी सांगितले की, पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. परंतु १ वर्षीय बालकाला एएफपी (अॅक्यूट फ्लासिड पॅरालाईज) झाला आहे. त्याच्या शौचाचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहेत. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थानिक डॉक्टर्सनीदेखील या प्रकरणाची नोंद घेतली आहे.
एन-११ मध्ये पोलिओचा रुग्ण?
By admin | Updated: August 29, 2014 01:32 IST