शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:36 IST

शहरातील वाहतुकीला शिस्त लावताना वाहतूक शाखेच्या नाकीनऊ आणणाºया वाहनांसाठी दूध डेअरी चौकात मंगळवारपासून वेगळा प्रयोग केला आहे. चौकात अधिक काळ थांबण्यापेक्षा एकाच वेळी दोन सिग्नल सुरू केल्याने चौकातील गर्दी विरळ झाली आहे. सोमवारी वाहतुकीचा नवा प्रयोग करताना वाहतूक कोंडी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील वाहतुकीला शिस्त लावताना वाहतूक शाखेच्या नाकीनऊ आणणाºया वाहनांसाठी दूध डेअरी चौकात मंगळवारपासून वेगळा प्रयोग केला आहे. चौकात अधिक काळ थांबण्यापेक्षा एकाच वेळी दोन सिग्नल सुरू केल्याने चौकातील गर्दी विरळ झाली आहे.सोमवारी वाहतुकीचा नवा प्रयोग करताना वाहतूक कोंडी झाली. मात्र मंगळवारी याठिकाणी वाहतूक सुरळीत चालू असल्याचे चित्र दिसले. या नव्या प्रयोगाची शहरातही चर्चा होती. या चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारले असून, पादचाºयांनाही रस्ता सुरक्षित केला असून, वाहनांना एका विशिष्ट रेषेपर्यंत थांबण्याच्या सूचना मिळाल्याचे संकेत आहे. थोडा फार वाहनधारकांना त्रास वाटला; परंतु वाहने अधिक काळ सिग्नलवर (ग्रीन सिग्नल) ची वाट न पाहता मार्गक्रम करता आले.एकाच वेळी दोन्ही बाजूच्या वाहनांना पुढे जाण्याची संधी मिळत असल्याने अनेकजण पोलिसांकडे हात उंचावून अंगठा दाखवून प्रयोग चांगला असल्याची पावती दिली. काही नागरिकांनी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांना भ्रमणध्वनीवरदेखील शुभेच्छा दिल्या.जीवघेणा धोका टळलावाहतुकीला शिस्त लावण्यासाठी हा पहिलाच प्रयोग या चौकात वापरल्याने वनवे वाहने तसेच नियमानुसार दोन्ही वाहतूक एकाच वेळी देखील सुरू केल्याने चौथा सिग्नलचा नंबर येईपर्यंत चालक वैतागलेला दिसतो. त्याच परिस्थितीत तो मध्येच घुसून सिग्नल तोडत निघून जातो, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यावर तोडगा म्हणून वाहतूक शाखेने पहिले पाऊल उचलून आगळावेगळा प्रयोग केला. सोमवारी फक्त दोºया लावून वाहनांना सुरळीत करण्याचा प्रत्यन केला होता; परंतु मंगळवारी या प्रयोगाला प्रारंभ झाला अन् सिग्नलच्या गर्दीतून लवकर सुटका झाल्याने प्रत्येक वाहनचालक खुश दिसत होता.दुसरे सिग्नलदेखील लवकर सुरू करा...४जास्त काळ सिग्नलवर वेळ वाया गेला नाही; परंतु इतर सिग्नलवर थांबावे लागले. दूध डेअरी सिग्नलवर केलेला प्रयोग इतर सिग्नलवर देखील करावा, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांतून व्यक्त होताना दिसल्या.दुसºया चौकाचा विचार करू...सिग्नलवर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केलेला प्रयोग पहिल्याच दिवशी यशस्वी ठरताना दिसतो आहे. ११ वाहतूक शाखेचे कर्मचारी व अधिकारी देखरेखीवर असून, फिक्स पॉइंट करून या प्रयोगाची दुसºया चौकात अंमलबजावणी करू, असे सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी सांगितले.