शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी उतरवले संशयाचे भूत...!

By admin | Updated: December 22, 2015 00:10 IST

औरंगाबाद : पती-पत्नीतील नाते हे विश्वासावर टिकून असते. या दोघांपैकी एकामध्ये जरी विश्वासाचा धागा तुटला तरी संसाराचा गाडा चालत नाही.

औरंगाबाद : पती-पत्नीतील नाते हे विश्वासावर टिकून असते. या दोघांपैकी एकामध्ये जरी विश्वासाचा धागा तुटला तरी संसाराचा गाडा चालत नाही. त्यामुळे संसार टिकवायचा असेल तर एकमेकांविषयी आदर, प्रेम आणि विश्वास ठेवण्याची जबाबदारी ही दोघांवरही असते. अशाच एका घटनेत ब्ल्यू फिल्ममध्ये दिसणारी महिला ही आपलीच पत्नी आहे, असा समज करून घेतलेल्या नवरोबाच्या मानगुटीवर पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण झाला. ब्ल्यू फिल्मच्या क्लिपिंगमध्ये दिसणारी तूच आहे, असे म्हणत त्याने पत्नीला बदडले. वारंवार सांगूनही पती ऐकत नसल्याने मार टाळण्यासाठी त्या बिचारीने शेवटी आपणच असल्याची खोटी कबुली दिली. मग हे नवरोबा पत्नीला गुन्हेगार ठरविण्यासाठी क्राईम ब्रँचकडे आले. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्या फिल्म पाहून फिल्ममधील महिलेचा आणि या महिलेचा काहीही संबंध नसल्याचे तिच्या पतीला पटवून दिले. शनिवारी रात्री घडलेल्या या विचित्र घटनेत संशयाचे भूत डोक्यात घुसलेला तरुण हा एक ा खाजगी कंपनीत नोकरी करतो. त्याची पत्नी शिक्षिका आहे. काही दिवसांपासून त्याला ब्ल्यू फिल्म पाहण्याची सवय लागली. त्याच्याकडील अँड्रॉईड मोबाईलवर कधी मित्राकडून मागवून तर कधी इंटरनेटच्या माध्यमातून पोनोग्राफीच्या साईटस्वरील सेक्स क्लिप तो पाहू लागला. त्याने पाहिलेल्या एका क्लिपमधील स्त्री ही आपलीच पत्नी आहे, असा त्याचा गैरसमज झाला. त्यावरून शनिवारी रात्री पत्नीला मारहाण करण्यास त्याने सुरुवात केली. त्या घाणेरड्या क्लिपशी आपला काहीही संबंध नाही, असे त्या बिचारीने जीव तोडून वारंवार सांगितले. अखेर मार टाळण्यासाठी तिने न केलेला गुन्हा कबूल केला. त्यानंतरही त्याने तिला पुन्हा बेदम मारहाण करीत तू ही फिल्म कोठे बनविली, याची माहिती पोलिसांना दे, असे म्हणून तो तिला घेऊन क्र ाईम ब्रँचमध्ये आला.