लातूर : लातूर तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गुरुवारी मतमोजणीसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तालुक्यातील ग्रामपंचायतीची मतमोजणी बार्शी रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन येथे झाली. त्यामुळे बार्शी रोडवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता. पाच नंबर चौकापासून बार्शी रोडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. ग्रामीण भागातून आलेल्या बहुतांश नागरिकांना मार्ग माहीत नसल्याने अनेकांची गैरसोय झाली. पाच नंबर चौकातच वाहने लावून कार्यकर्ते भरउन्हात मतमोजणी कक्षाकडे निघाले होते. विविध ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मतमोजणी कक्षात जाण्यासाठी तब्बल चार ठिकाणी पोलिसांसमोर झडती दाखवीत कक्षात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनाही प्रवेश करावा लागला.
मतमोजणीसाठी पोलिस बंदोबस्त
By admin | Updated: April 24, 2015 00:38 IST