शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

पोलिस चौकीचे कुलूप उद्घाटनापासून निघेना!

By admin | Updated: June 28, 2014 01:15 IST

शिरूर अनंतपाळ : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या येथील मुख्य रस्त्यावरील पोलिस चौकीचे गेल्या सहा महिन्यापासून कुलूपच निघाले नसल्याने ही चौकी केवळ नाममात्रच ठरत आहे़

शिरूर अनंतपाळ : लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या येथील मुख्य रस्त्यावरील पोलिस चौकीचे गेल्या सहा महिन्यापासून कुलूपच निघाले नसल्याने ही चौकी केवळ नाममात्रच ठरत आहे़ शिरूर अनंतपाळच्या मुख्य रस्त्यास राज्य मार्गाचा दर्जा मिळाल्याने आणि अतिक्रमण हटावची मोहिम धडकपणे राबविण्यात आल्याने येथील उदगीर रस्त्यावर मोठा चौक सहा महिन्यापूर्वी निर्माण झाला़ या मोकळया चौकाला नाव देण्यासाठी अनेक सामाजिक संघटनाही सरसावल्या़ परंतु, गावातील ज्येष्ठ नागरिकांनी चौकाऐवजी पोलिस चौकी निर्माण केल्यास अधिक फायदेशीर ठरेल, अशी कल्पना सुचविली़ पोलिस चौकीमुळे वाहतुकीचे नियंत्रण होईल़ रहदारी सुरळीत होईल, त्याचबरोबर गावात नेहमी शांतता रहावी म्हणून पोलिसांना बसण्यास निश्चित ठिकाण होईल, अशी या कल्पनेमागील भावना होती़ त्यानुसार लोकसहभागातून हजारो रूपये निधी गोळा करून पोलिस चौकी सहा महिन्यापूर्वी उभारण्यात आली़ विशेष म्हणजे चौकीत बसण्यासाठी टेबल, खुर्चीची व्यवस्थाही करण्यात आली़ या पोलिस चौकीचे रितसर पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकीदार नियुक्त करण्यात येईल, अशी घोषणाही केली़ उद्घाटनानंतर मात्र ही घोषणा हवेतच विरली़ सहा महिन्यापासून पोलिस ठाण्याकडून चौकीदार नियुक्त करण्यात आला नसल्याने पोलिस चौकी कुलूपबंद आहे़ (वार्ताहर)चौकीदार देण्यात येईल़़़शिरूर अनंतपाळ येथे उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीसाठी एका पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती लवकरच करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक बंडोपंत मुंडे यांनी सांगितले़या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी पोलिसांनी चोख भूमीका बजावली होती़ परंतु, आता ही चौकीच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे़ पोलिसही उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहत आहेत़ चौकीदार नसल्याने गावात पुन्हा रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सध्या मुख्य रस्त्याचे काम सुरु असल्याने एकीरी वाहतूक सुरु आहे़ त्यामुळे पोलिस चौकी सुरु करावी, अशी मागणी होत आहे़