शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीडितेच्या जबाबानंतरच पोलीस उपायुक्तांना होणार अटक; चार दिवसांनंतरही पीडिता आहे गायबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 10:51 IST

पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर बलात्काराचा आरोप करून गायब झालेली पीडिता चार दिवस उलटल्यानंतरही पोलिसांना सापडत नाही.

ठळक मुद्दे तरुणीचा जबाब झाल्यानंतरच श्रीरामे यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाणार २२ वर्षीय तरुणीने श्रीरामे यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार पोलीस आयुक्तालयाच्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर पाठविली होती.

औरंगाबाद : पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्यावर बलात्काराचा आरोप करून गायब झालेली पीडिता चार दिवस उलटल्यानंतरही पोलिसांना सापडत नाही. दुसरीकडे तरुणीचा जबाब झाल्यानंतरच श्रीरामे यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

हिमायतबाग परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने श्रीरामे यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार पोलीस आयुक्तालयाच्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर पाठविली होती. २१ जून रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर शहानिशा करण्यासाठी ती महिला तक्रार निवारण मंचकडे देण्यात आली. महिला तक्रार निवारण मंचच्या पोलिसांनी पीडितेला बोलावून घेतले. व्हॉटस्अ‍ॅपवरील पाठविलेली तक्रार तिचीच असल्याबाबत तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी पीडितेने ती तक्रार तिनेच पाठविल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. नंतर त्या तक्रारीच्या अर्जावर तिने स्वाक्षरी केली. त्यावेळी तिला एमआयडीसी सिडको ठाण्यात जबाब नोंदविण्यासाठी येण्याचे पोलिसांनी सांगितले; मात्र तेव्हापासून पीडिता गायब असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

शेवटी २६ जून रोजी याप्रकरणी तिच्या परस्पर पोलिसांनी उपायुक्तांविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला. हा गुन्हा नोंदवून शुक्रवारी चार दिवस उलटले; मात्र अद्यापही ती पोलिसांसमोर आली नाही. तिला शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने तिच्या घरी अनेकदा चकरा मारल्या; मात्र ती घरी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर पीडितेच्या मोबाईल क्रमांकावर अनेकदा फोन करून आणि मेसेज पाठवून एमआयडीसी सिडको ठाण्यात येण्याचा निरोप तिला देण्यात आला; परंतु ती अद्यापही जबाब देण्यासाठी आली नसल्याचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितले. 

यू-ट्यूबवरील क्लीप व्हायरलपोलीस उपायुक्तांवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारा पीडितेचा व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आल्याचे समोर आले. यू-ट्यूबवरील ही क्लीप व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून विविध ग्रुपवर गुरुवारी रात्रीपासून व्हायरल झाली. या क्लीपमध्ये पीडितेने चेहरा झाकलेला आहे. यामुळे उपायुक्तांवर आरोप करणारी तीच पीडिता आहे अथवा नाही, हे स्पष्ट होत नाही. असे असले तरी हा व्हिडिओ यू-ट्यूबवर कोणी अपलोड केला, याबाबतचा शोध सायबर क्राईम सेल घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसArrestअटक