शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदार चतुर्भुज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:51 IST

अटक टाळण्यासाठी अंबड येथील एका आरोपीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आलमगाव बीटचा पोलीस हवालदार सय्यद आरेफोद्दीन शरिफोद्दीन यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अटक टाळण्यासाठी अंबड येथील एका आरोपीकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आलमगाव बीटचा पोलीस हवालदार सय्यद आरेफोद्दीन शरिफोद्दीन यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले.अंबड येथील शेख गफूर शेख बीबन यांच्या शेख अजीम नामक मुलाने २०१४ मध्ये आत्महत्या केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये शेख गफूर यांच्याविरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात अटक टाळण्यासाठी शेख गफूर यांना पोलीस हवालदार सय्यद आरेफोद्दीन यांनी ४० हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.लाच देण्याची इच्छा नसल्याने शेख गफूर याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरुवारी तक्रार केली. त्याच दिवशी अंबड येथे लाचलुचपत विभागाच्या पथकाने खातरजमा केली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे व तो ती स्वीकारणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी पथकाने सापळा लावून नगर परिषद रोडवर असलेल्या एका दुकानासमोर तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार सय्यद आरेफोद्दीन शरीफोद्दीन यास रंगेहाथ पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलिस अधीक्षक एस. आर. गिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलिस निरीक्षक व्ही. एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, अमोल आगलावे, नंदू शेंडीवाले, रामचंद्र कुदर, म्हस्के, गंभीर पाटील, संदीप लव्हारे, महेंद्र सोनवणे, खंदारे यांच्या पथकाने ही कार्यवाही पार पाडली.