शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट स्पर्धेत पोलीस आयुक्तालय संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:32 IST

एमजीएम मैदानावर शुक्रवारी झालेल्या चौरंगी क्रिकेट स्पर्धेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस आयुक्तालय संघाने प्रिंट मीडिया संघावर ४३ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले.

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर शुक्रवारी झालेल्या चौरंगी क्रिकेट स्पर्धेत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस आयुक्तालय संघाने प्रिंट मीडिया संघावर ४३ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले.पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित एमजीएम येथे झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर व यजमान पोलीस आयुक्तालयाचा संघ सहभागी झाला होता. पोलीस आयुक्तालय संघाने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ६ बाद १२८ धावा ठोकल्या. यात पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी स्फोटक फलंदाजी करताना २७ चेंडूंतच ३ सणसणीत चौकार व एका टोलेजंग षटकारांसह ४० धावांची आकर्षक खेळी केली. असीफ शेखने ९ चौकारांसह ५८ धावांची आक्रमक खेळी केली. प्रत्युत्तरात १२९ धावांचे लक्ष्य घेऊन खेळणारा प्रिंट मीडियाचा संघ २० षटकांत ८५ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून दुर्गेश जोशीने १९ व तौसीफने १६ धावा केल्या. पोलीस आयुक्तालय संघाकडून महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बरोरिया यांनी ३ गडी बाद केले. या स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाजाचा मान उदयंश यादव याने पटकावला, तर मालिकावीर पोलीस आयुक्त यशस्वी यादव ठरले. दुर्गेश जोशी सर्वोत्तम यष्टिरक्षक ठरला.