शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

कविता म्हणजे कवीची विवेकी जीवनदृष्टी

By admin | Updated: September 8, 2014 00:33 IST

औरंगाबाद : कविता केवळ शब्दांचा खेळ वा ओळींची उतरंड नसून, ती कवीची विवेकी जीवनदृष्टी असते.

औरंगाबाद : कविता केवळ शब्दांचा खेळ वा ओळींची उतरंड नसून, ती कवीची विवेकी जीवनदृष्टी असते. काव्यलेखनासारखे जबाबदारीचे, मौलिक कृत्य करताना कवी संतत्वाकडे प्रवास करू लागतो. कवी कविता लिहीत राहील तोवर समाजातील विषमता व विसंगतींनाही टोकदार उत्तर मिळत राहील, अशी भावना कवी, कादंबरीकार रमेश इंगळे- उत्रादकर यांनी रविवारी व्यक्त केली. प्रतिभावंत साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनी आयोजित बी. रघुनाथ स्मृतिसंध्येत इंगळे बोलत होते. नाथ ग्रुप, परिवर्तन व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित या सोहळ्यात रमेश इंगळे यांना लेखक संजय भास्कर जोशी यांच्या हस्ते बी. रघुनाथ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी सतीश कागलीवाल, नंदकिशोर कागलीवाल, डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. डॉ. मोहन फुले, अजित दळवी, श्रीकांत उमरीकर, सीताराम अग्रवाल, हनुमानप्रसाद बगडिया व शिव फाळके उपस्थित होते. इंगळे म्हणाले की, कवितेतून कवी आपला आतला आवाज शब्दांत गोठवत असतो. केवळ जातिवंत वाचकच हा आवाज ऐकू शकतो. कवितेला सोबत घेऊनच कवी जगतो. व्यवस्थेशी होणारा संघर्ष हा कवीच्या जगण्याचाच भाग असतो. यातून त्याच्यासह त्याची कविताही समृद्ध होते. मात्र, कविता निर्वात पोकळीत निर्माण होत नसून तिला काही एक सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अधिष्ठान लागते, असेही ते म्हणाले. मनोगताच्या शेवटी त्यांनी वाचलेल्या ‘हे माझे आई’ व ‘यत्किंचित दु:खाचे कारण’ या दोन कवितांना रसिकांची उत्कट दाद मिळाली. नात्यातील हरवत जाणारी ओल, आटणारा संवाद याचा वेध घेते. महेश अचिंतलवार यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला साहित्यक्षेत्रातील मान्यवर व रसिक उपस्थित होते.