वाचकपीठ या वाङ्मयीन चळवळीच्या वतीने दि. ९ मे रोजी १० व्या राष्ट्रीय चर्चासत्राचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कवी, लेखक, गीतकार हबीब भंडारे यांच्या ‘जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता’ या कवितासंग्रहावर चर्चासत्र घेण्यात आले.
अलिगढ केंद्रीय विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख लेखक, समीक्षक डॉ. ताहेर पठाण, लेखक डॉ. कैलास अंभुरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वाचकपीठचे संयोजक भास्कर निर्मळ पाटील, प्राचार्य चंद्रकांत भोसले, कवयित्री प्रिया धारुरकर, माधुरी चौधरी, कवी किरण भावसार, भानुदास महानुर, अरविंद सोनवणे, यशवंत कुलाटे, डॉ. विजय भगत, संदीप भदाणे, शरद ठाकर यांची विशेष उपस्थिती होती.
भंडारे यांची कविता ही कवितेची परिभाषा बदलते, अशा शब्दांत डॉ. अंभुरे यांनी भंडारे यांच्या कवितेचे कौतुक केले. लेखक अनंत कराड यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. दादा नन्नवरे यांनी संचलन केले. राजेंद्र उगले, किरण भावसार यांनी आभार मानले.