जालना : शहराची ओळख खड्डेवाडी झाली आहे. या खड्ड्यांतून जालनेकरांना आता मुक्ती मिळणार असून, सिमेंट रस्त्यावरून जालनेकरांचा प्रवास अता सुखद होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांचे सिमेंट कॉक्रिंटीकरण होत असून, हे काम सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. यातील सर्वच कामांना सुरूवात झाली आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांची स्थिती नाजूक आहे. डांबरीकरण केलेले तरी सहा महिन्यात रस्त्याची स्थिती जैसे थेच होत आहे. यामुळे खड्ड्यांपासून मुक्ती मिळावे म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून सहा प्रमुख रस्त्यांसाठी १९.९८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी भोकरदन नाका ते राऊतनगर रस्त्याचे कामही सुरू झाले आहे. आगामी सहा महिन्यांत सर्वच रस्त्यांची कामे पूर्ण होतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी व्यक्त केला. रस्त्यांची सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहे. यात भोकरदन नाका ते राऊत नगर, राऊत नगर ते मामाचौक, सिंधी बाजार ते टांगास्टँड, शिवाजी पुतळा. शिवाजी पुतळा ते कादराबाद, पाणीवेस, मुथा बिल्डींग, बसस्थानक, मुथा बिल्डींग ते महावीर चौक़ मामा चौक, सरस्वती प्रेस, सिंधी पंचायत ते सिंधी बाजार, पाणीवेश, मंमादेवी, गांधी चमन, गांधी चमन ते शनि मंदिर ते काली मशीद या मार्गांचे काँक्रिटीकरण होणार आहे.
सिमेंट रस्त्यांमुळे होणार सुखद प्रवास
By admin | Updated: October 18, 2016 00:04 IST