शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुखद ! औरंगाबादहून आता दररोज सकाळी मुंबईसाठी ‘उड्डाण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 19:19 IST

Aurangabad Airport : किमान आठवड्यातून ३ दिवस सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत औरंगाबादेत परतणेही प्रवाशांना शक्य होणार आहे.

ठळक मुद्देइंडिगोने काही दिवसांपूर्वीच प्रवाशांची मागणी पाहून मुंबईसाठी रोज विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर ८ जानेवारीपासून सकाळी १०.२० वाजता औरंगाबादहून मुंबईसाठी विमान उड्डाण

औरंगाबाद : इंडिगोचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ८ जानेवारीपासून दुपारऐवजी आता सकाळच्या वेळेत उड्डाण घेणार आहे. त्यामुळे मुंबईला लवकर जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे.

इंडिगोने काही दिवसांपूर्वीच प्रवाशांची मागणी पाहून मुंबईसाठी रोज विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही विमानसेवा आठवड्यातून ३ दिवस आहे. मात्र, ८ जानेवारीपासून हे विमान दररोज उड्डाण घेणार आहे. मुंबईसाठी शहरातून रोज हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध राहणार आहे. हे विमान सध्या मुंबईहून येऊन औरंगाबादहून दुपारी १२.१० मुंबईला रवाना होते. मुंबईत पोहोचेपर्यंत एक वाजून जातो. त्यामुळे अर्धा दिवस औरंगाबादेत आणि अर्धा दिवस मुंबईत अशी प्रवाशांची अवस्था होती. त्यातून नियोजित कामे करण्यास अनेक अडचणी येतात.

त्यामुळे मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानाचे उड्डाण झाले पाहिजे, अशी मागणी होत होती. त्यासाठी इंडिगोकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर ८ जानेवारीपासून सकाळी १०.२० वाजता औरंगाबादहून मुंबईसाठी विमान उड्डाण घेईल,अशी माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली. आठवड्यातून ३ दिवसांसाठी एअर इंडियाचीही मुंबईसाठी विमानसेवा सुरु आहे. त्यामुळे किमान आठवड्यातून ३ दिवस सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत औरंगाबादेत परतणेही प्रवाशांना शक्य होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ