शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

सुखद ! दिल्लीपेक्षा औरंगाबादची हवा चांगली; प्रदूषण नियंत्रण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:38 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त होताना तुलनात्मक विचार केल्यास कोरोना संक्रमण रोखण्यात दिल्लीपेक्षा औरंगाबादेची हवा काहीशी आरोग्यदायी ठरेल

ठळक मुद्देऔरंगाबादच्या हवेच्या गुणवत्तेत कमालीची सुधारणा झाल्याने प्रत्येकाला आरोग्यदायी मोकळा श्वास घेता आला. कोरोना आणि वायुप्रदूषणाच्या दुहेरी संक्रमणात नागरिकांनी विशेष काळजी घेण्यासाठी जनजागृतीही तितकीच गरजेची आहे.

- योगेश पायघन

औरंगाबाद : भारतात कोरोनासोबत वायुप्रदूषणाशीसुद्धा दुहेरी लढा द्यावा लागत आहे. दिल्लीसह उत्तर भारतात हवेचे प्रदूषण अधिक असल्याने तेथे हा दुहेरी धोका अधिक तीव्र आहे. औरंगाबादमधील हवेतील प्रदूषण दिल्लीपेक्षा कमी असल्याने कोरोनाची दुसरी लाट आली, तरी त्याचा परिणाम दिल्लीपेक्षा औरंगाबादेत कमी दिसेल, असा अंदाज पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केला.

कोरोना आणि वायुप्रदूषणाच्या दुहेरी संक्रमणात नागरिकांनी विशेष काळजी घेण्यासाठी जनजागृतीही तितकीच गरजेची आहे. विशेषतः ज्यांना फुफ्फुस व श्वसनासंबंधी आजाराने ग्रासले आहे, त्यांनी स्वत:ला जपाने. कारण कोरोनाची लागण झाल्यास शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, तर प्रदूषणाने श्वसनातही अडथळा निर्माण होतो. तीव्र श्वसनविकाराचा आजार सीओपीडी आणि दमा, अस्थम्याचे रुग्ण अधिकच वाढत असताना प्रदूषणासंबंधी अधिक सावधानी बाळगणे गरजेचे आहे. प्रदूषणामुळे फुफ्फुसे आकुंचन पावतात. कमजोर होतात. त्यामुळे कोरोनादरम्यान, न्यूमोनियासारख्या आजाराची गुंतागुंत होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशनकडे दुर्लक्ष व्हायला नकाे. शिवाय प्रदूषण नियंत्रण गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

लाॅकडाऊनमध्ये औरंगाबादच्या हवेच्या गुणवत्तेत कमालीची सुधारणा झाल्याने प्रत्येकाला आरोग्यदायी मोकळा श्वास घेता आला. हे जूनमध्ये अर्बन मिशनच्या अहवालावरून स्पष्ट झाले होते. अनलाॅकनंतर प्रदूषणात वाढ होताना दिसत असली तरी दिल्लीच्या तुलनेत येथील प्रदूषण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त होताना तुलनात्मक विचार केल्यास कोरोना संक्रमण रोखण्यात दिल्लीपेक्षा औरंगाबादेची हवा काहीशी आरोग्यदायी ठरेल, असे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सतीश पाटील यांनी सांगितले. अतिसूक्ष्म धूलिकण, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि कार्बन मोनाक्साईड या प्रदूषकांच्या ठरलेल्या मर्यादांत दिल्लीपेक्षा औरंगाबाद मर्यादेच्या काठावर तर दिल्ली तीव्र अतितीव्र श्रेणीत मोडते. यात अनेक घटक मोडतात. उद्योग, वाहनांची संख्या आणि तापमानाचाही विचार झाल्यास औरंगाबादेतील प्रदूषण कमी आहे.

थंडी ठरू शकते पोषकहवा गुणवत्ता निर्देशांकाच्या केलेल्या श्रेणींमध्ये औरंगाबादची हवा चांगली आणि समाधानकारक श्रेणीत मोडते, तर दिल्लीची हवा अतिखराब व तीव्र खराब श्रेणीत कायम असते. त्यातील प्रदूषकांचे प्रमाण औरंगाबादच्या तुलनेत अधिक असते. ते आरोग्यास अपायकारक ठरते, तर तेथील हवामान, भाैगोलिक परिस्थिती, हवा वाहण्याचा वेग आणि दिशा, या औरंगाबादपेक्षा भिन्न आहेत. तेथील थंड हवा कोरोना संक्रमण वाढीसाठी पोषक ठरू शकते. तुलनेत औरंगाबादमध्ये हे प्रमाण कमी असण्याचा अंदाज आहे.-सतीश पाटील, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद