शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक डॉक्टरांकडे नोंदणीच नाही

By विजय सरवदे | Updated: October 19, 2023 12:05 IST

तपासणी मोहीमेत जिल्हा आरोग्य विभागाने बजावल्या नोटीस

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अनेक जण अवैधरीत्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत काही जणांकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक नोंदणी (रजिस्ट्रेशन) नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा डॉक्टरांना नोटीस देण्यात आल्या आहेत. खबरदारी म्हणून हे डॉक्टर बोगस आहेत का नाहीत, याची तपासणी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

या मोहिमेत ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करीत असलेल्या काही डॉक्टरांसंदर्भात ग्रामपंचायत, वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत अहवाल मागविण्यात आले. त्यात अनेकांकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे दिसून आले. आता या डॉक्टरांच्या पदवीबाबत तपासणी करून जर ते बोगस आढळून आले, तर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.

जिल्ह्यातील ६९२ अंगणवाड्यांतील १८ हजार ७६ बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५३६ बालके अतिगंभीर, गंभीर कुपोषित श्रेणीमध्ये निष्पन्न झाली असून त्यांना योग्य तो आहार देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. दलित वस्ती सुधार कार्यक्रमांतर्गत पाच वर्षांसाठीचा आराखडा तयार केला आहे. ३० कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीतून तरतूद आहे. याअंतर्गत शासननिर्देशानुसार विकासाची कामे केली जातील. समाजकल्याण विभागांतर्गत दिव्यांग संवर्गातील लाभार्थ्यांना ऑक्टोबर अखेर साहित्य वाटप केले जाईल. जिल्ह्यातील २५४ जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत बांधण्याचे प्रस्ताव आले आहेत. त्याबाबत पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही केली जाईल, असे मीना यांनी सांगितले.

जिल्हा परिषद प्रशासन सज्जपाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या असून मागणीनुसार पाण्याचे टँकरही सुरू करण्यात आले आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करून जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असेही ‘सीईओ’ विकास मीना यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टरAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद