शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

‘खेलो इंडिया’त औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धी चमकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:05 IST

नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या सिद्धी हत्तेकर हिने अन्इव्हन बार या क्रीडा प्रकारात रौप्य, तर रिद्धी हत्तेकर हिने सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्टपटू म्हणून चौथे मानांकन मिळवून आपला विशेष ठसा उमटवला. १७ वर्षांखालील गटात मुलींच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.

औरंगाबाद : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत औरंगाबादच्या सिद्धी हत्तेकर हिने अन्इव्हन बार या क्रीडा प्रकारात रौप्य, तर रिद्धी हत्तेकर हिने सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्टपटू म्हणून चौथे मानांकन मिळवून आपला विशेष ठसा उमटवला.१७ वर्षांखालील गटात मुलींच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. औरंगाबादच्या हत्तेकर भगिनींच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष लागून होते. पहिल्या दिवशी झालेल्या सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्ट स्पर्धेत पूर्वा किरवे (ठाणे) हिने ४०.८५ गुण मिळवत कास्यपदक पटकावले, तर रिद्धी हत्तेकर हिने आपल्या पाठीच्या दुखण्यातून सावरत ३८.५५ गुणांची कमाई करीत चौथे स्थान प्राप्त केले, तसेच सिद्धी हत्तेकर हिने ३८.०५ गुण मिळवत पाचवे स्थान प्राप्त केले.त्यानंतर साधन अंतिम स्पर्धा प्रकारात सिद्धीने अनइव्हन बारवर नेत्रदीपक कामगिरी करीत ८.४० गुण घेत रौप्यपदक पटकावले, तर महाराष्ट्राच्या पूर्वा किरवेने ८.६५ गुण घेत सुवर्णपदक पटकावले. रिद्धी हत्तेकरने बॅलन्सिंग बीम या साधन प्रकारावर अचूक संच केला; मात्र काठिण्य पातळी कमी पडल्यामुळे तिला चौथ्या स्थानावर (१०.७० गुण) समाधान मानावे लागले.रिद्धी व सिद्धी या भगिनी शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या आठवीतील विद्यार्थिनी असून, औरंगाबादच्या साई पश्चिम विभाग केंद्रात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. यापूर्वी त्यांना मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर क्रीडा प्रशिक्षक तनुजा गाढवे यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे.या यशाबद्दल ‘साई’चे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, मुख्य प्रशिक्षक अजितसिंग राठोड, सहायक प्रशिक्षक पिंकी देब, महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मकरंद जोशी, औरंगाबाद जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. संकर्षण जोशी, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, तनुजा गाढवे, सचिव प्रा. सागर कुलकर्णी, साईचे संतोष कुन्नापुडा, शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा देव, उपमुख्याध्यापिका उज्ज्वला निकाळजे, क्रीडा शिक्षिका जगताप आदींनी या भगिनींचे अभिनंदन केले आहे.