शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

जालन्यात प्लास्टिक सर्जरी शिबीर

By admin | Published: July 21, 2014 11:36 PM

जालना : येथी १५ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान भव्य प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश रा. वि. देशमुख यांनी दिली.

जालना : महाराष्ट्रात प्रथमच न्यायालयाच्या पुढाकाराने येथील विधि सेवा प्राधिकरण, अकोला येथील श्रीराम हॉस्पिटल आणि जालना येथील ओम हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने १५ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान भव्य प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश रा. वि. देशमुख यांनी दिली.सदरील शिबिरात प्रामुख्याने दुभंगलेली टाळू, फाटलेले ओठ या संबंधीच्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिराचे नियोजन करण्यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरातील विधि सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. रा. वि. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, अपर पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सालयातील डॉ. राठोड, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. एफ. एम. ख्वाजा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, डॉ. के. के. अग्रवाल, डॉ. खान, डॉ. प्रकाश सिगेदार, डॉ. पोकळे, अ‍ॅड. सतीश तवरावाला, अ‍ॅड. जे. सी. बिडवे, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, अ‍ॅड. मुंढे, अ‍ॅड. तिडके आदींची उपस्थिती होती.या शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. रुग्णांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. रुग्णांना लागणारा आहार (दूध) आणि एका नातेवाईकाच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णांचा व त्याच्या एका नातेवाईकांचा प्रवास खर्च देण्यात येणार आहे. जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत १५ आॅगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची सोय करण्यात येणार आहे.