प्रसिद्ध प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॅा.मयूर गोकलानी हे मार्गदर्शन करणार आहेत. या क्लिनिकमध्ये अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञानाची नवीनतम यंत्रसामग्री उपलब्ध आहेत. लेसर तंत्रज्ञानाद्वारे अनावश्यक केस काढून टाकण्यासाठीही येथे विशेष ऑफर सुरु आहे. कॉस्मेटिक सर्जरीत पापण्यांची सर्जरी, शरीरातील अतिरिक्त फॅट काढून टाकण्याची सर्जरी, नाकाला पुर्नआकार देणे, टॅटू तसेच मस काढून टाकणे, हेअर ट्रान्सप्लांटेशन, ब्रेस्ट सर्जरी, पोट दुमडलेले असणे, कॉस्मेटिक जेनिटल सर्जरी, बोटोक्स, लेझर तसेच पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया यामध्ये शरीरावरील व्यंग झालेल्या अवयवांची पुनर्रचना करून रुग्णाला नवीन सौंदर्य बहाल केले जाते. या सर्वाविषयी शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. गोकलानी यांनी केले आहे.
प्लास्टिक सर्जरी जनजागृती शिबिर आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:04 IST