शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

उपकराच्या निधीचे नियोजन रोखले, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यांनी घेतला आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 17:23 IST

जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण, हायमास्ट दिवे आणि जि.प. मालकीच्या मालमत्तांना संरक्षण भिंती अथवा तारकंपाऊंड करण्यासाठी उपकरात ९० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेल्या उपकरातील ९० लाख रुपयांच्या निधीचे नियोजन सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच करावे, अन्यथा स्थायी समितीच्या बैठकीत हे नियोजन रद्द केले जाईल, असा पवित्रा अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच काही सदस्यांनी घेताच बांधकाम व अर्थ समिती सभापतींनी सावध पवित्रा घेत कामांचे नियोजन थांबवीत असल्याचे त्यांना सांगितले.

जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण, हायमास्ट दिवे आणि जि.प. मालकीच्या मालमत्तांना संरक्षण भिंती अथवा तारकंपाऊंड करण्यासाठी उपकरात ९० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. दोन-तीन दिवसांपूर्वी बांधकाम समितीची बैठक झाली. या बैठकीत बांधकाम समिती सदस्यांनी त्यांच्या सर्कलमध्येच या तिन्ही लेखाशीर्षाखाली तरतूद असलेल्या निधीचे नियोजन केले. ही माहिती आज अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, उपाध्यक्ष केशव तायडे, स्थायी समिती सदस्य रमेश गायकवाड, अविनाश गलांडे, किशोर बलांडे यांना समजली. या प्रकाराबद्दल या सदस्यांनी संताप व्यक्त करत नियोजन रोखण्याचा एकत्रित निर्णय घेतला. 

उपकराच्या निधीची तरतूद ही बांधकाम समितीच्या सदस्यांसाठी नसून ती जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांसाठी आहे. या निधीचे नियोजन परस्पर विषय समितीमध्ये न करता सर्वांना विश्वासात घेऊन स्थायी समितीमध्ये करणे गरजेचे होते. उपाध्यक्ष केशव तायडे व अन्य सदस्यांनी बांधकाम सभापती विलास भुमरे यांची भेट घेऊन या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. सदरील निधीचे नियोजन तात्काळ रोखण्यात यावे, अन्यथा स्थायी समितीमध्ये ते रद्द करण्याची नामुष्की आणू नका, या भाषेत संताप व्यक्त केला. तेव्हा भुमरे यांनी बांधकाम समिती सदस्यांनी आग्रह केल्यामुळे निर्णय घ्यावा लागला. निर्णय घेतलेला असला तरी तो रद्द केला जाईल, असे आश्वासन दिले. 

सर्वांना समान न्याय कधी मिळणारनिधी वितरणामध्ये सर्वांना समान न्याय द्यावा, यासंबंधी भाजप सदस्यांनी तीन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेत उपोषण केले होते. यापूर्वी सर्वसाधारण सभेत याच मुद्यावर सभागृहाला वेठीस धरणाऱ्या भाजप सदस्याचे सदस्यत्व एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते. तरीही निधीची पळवापळवी थांबायचे नाव घेत नाही. यासंदर्भात आज काँग्रेस व शिवसेना सदस्यांनी एकत्रितपणे या प्रकाराला कडाडून विरोध केला, असे स्थायी समिती सदस्य किशोर बलांडे यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी