लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : असह्य उन्हाळाचा चटका आणि बहुतांश पावसाळ्यातही गरमीने हैराण राहिलेल्या औरंगाबादकरांसाठी यंदाचा हिवाळा दिलासा देणारा ठरत आहे. शहराचा पारा दिवसागणिक हळूहळू घसरत असून, डिसेंबर महिना चांगलाच हुडहुडी भरविणारा ठरणार आहे. शहराचे तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत उतरले असून, पहाटेच्या वेळी थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवत आहे.दिवाळीनंतर तापमानात घट होण्यास सुरुवात झाली होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस जेमतेम थंडीचा सामाना करावा लागला. ११ नोव्हेंबर रोजी शहराच्या तापमानाने १३ अंश सेल्सिअस ही नीच्चांकी गाठली. पारा असाच कमी होत जाणार, अशी अपेक्षा असताना मात्र १२ नोव्हेंबरपासून तापमानात वाढ दिसून आली. वातावरणात अचानक आलेल्या बदलामुळे ऐन थंडीत गरमी अनुभवयाला मिळाली. औरंगाबादमध्ये नोव्हेंबर महिन्यात सरासरी १५ अंश सेल्सिअस ताममान असते. मात्र, २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान पारा २१ अंशापर्यंत पोहोचला.त्यामुळे हिवाळ्याची चाहूल लागताच अनेकांनी कपाटातून बाहेर काढलेले उबदार कपडे पुन्हा पेटीत ठेवावे लागले. मात्र, २४ तारखेपासून थंडी वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली. १ डिसेंबर रोजी शहरात चिकलठाणा वेधशाळेने १४.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली. पुढील सात दिवसांत शहराचा पारा १४-१५ अंशांच्या आसपासराहणार आहे.
गुलाबी थंडीची हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:24 IST