नांदेड: पावसाळ््यास प्रारंभ होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप पेरण्या आटोपल्या नाहीत. मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांत पाऊस होत आहे, परंतु नांदेड जिल्ह्यात म्हणावा तेवढा पाऊस नसल्याने याचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाला असून नांदेडच्या बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी सर्वसामान्यांना मात्र अर्थिक झळ सोसावी लागत आहे.गेल्या महिन्यात भाजीपाल्याचे दर आवाक्यात होते, टोमॅटो तर शेतकऱ्यांना अक्षरश: रस्त्यावर फेकून द्यावे लागले. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोसह, वांग्याची शेती नांगरटी करुन खरिपाच्या पेरणीसाठी तयार केली. यामुळे बाजारातील आवक कमी झाल्याने आजघडीला शहरातील विविध बाजारपेठेसह तालुक्याच्या ठिकाणीही भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.सध्या बाजारात टोमॅटोचे भाव ८० रुपये किलो, हिरवी मिरची ६० रुपये किलो, वांगी ३० ते ४० रुपये किलो, फूलकोबी १२० रुपये किलो, पानकोबी ८० रु.किलो, कोथिंबीर २०० रु.किलो, कांदे २५ रुपये किलो, बटाटे २५ रु.किलो, ढोबळी मिरची ६० रु. भेंडी ६० रु. किलो, कारले ८० रु.किलो तर पालकची जुडी ५ रुपये याप्रमाणे बुधवारच्या आठवडी बाजारात दर होते. बाजाराज भाजीपाल्याचे दर भडकले आहेत, मात्र पालेभाज्याचे दर मंगळवारी पडलेल्या पावसामुळे आटोक्यात आले आहेत. बहुभूधारक व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी उन्हाळ््यातील उपलब्ध विहिरी, बोअरमधील पाण्याची स्थिती लक्षात घेवून केळी, हळद, गव्हाची लागवड न करता कमी दिवसांत येणाऱ्या भाजीपाला लागवडीस पसंती दिली. मात्र आता पाऊसच आला नसल्याने विहिरी, बोअरमधील पाणीपातळी खालावल्याने लागवड केलेला भाजीपाला कसा जोपासावा यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. पावसाअभावी पालेभाज्या व भाजीपाल्याची लागवड शेतकऱ्यांनी केलीच नाही. याचा परिणाम बाजारात आवक कमी होत असून दरात वाढ होत आहे. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही तर याचा परिणाम भाजीबाजारावर जाणवणार आहे. (प्रतिनिधी)
फूलकोबी १२० तर टोमॅटोे ८० रुपये किलोवर
By admin | Updated: July 24, 2014 00:27 IST