शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
3
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
4
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
5
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
6
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
7
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
8
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
9
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
10
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
11
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
12
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
13
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
14
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
15
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
16
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
17
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
18
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
19
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
20
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या

लसवंतांनाच द्या पेट्रोल, गॅस, रेशनचे धान्य; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 12:53 IST

corona vaccine: औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ५५ टक्के आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला मिळणारा अल्प प्रतिसाद, तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने कोरोना लस घेतलेल्या नागरिकांनाच पेट्रोल, गॅस, रेशनचे धान्य द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी रात्री जारी केले. तसेच जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर येणारे पर्यटक, अभ्यागतांनी लसीकरणाची किमान १ मात्रा घेतली नसेल तर त्यांना पर्यटनस्थळात प्रवेश दिला जाणार नाही.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आदेशाच्या अंमलबजावणीच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ५५ टक्के आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. राज्यात लसीकरणामध्ये औरंगाबाद जिल्हा २६ व्या क्रमांकावर आहे. शासनाने संपूर्ण राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनचे निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी केलेले असून, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे अपेक्षित आहे.

लस नाही तर वेतनही नाहीजिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना दाखविले तरच नोव्हेंबर महिन्याचे वेतन अदा केले जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोषागार विभागास दिले आहेत.

कृउबा समिती, पेट्रोलपंपावर काय करावेशेतकऱ्याचा माल घेण्यात यावा. लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कृषी मालाचे पैसे अदा करण्यापूर्वी लस प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी. तसेच पेट्रोल पंपावर बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तींची यादी करून लसीकरण प्रमाणपत्र आहे का विचारावे. प्रमाणपत्र नसल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी त्यांना पाठवावे. सर्व पेट्रोल पंपधारक, सर्व गॅस एजन्सीधारक, सर्व रेशन दुकानदार, कृषि उत्पन्न बाजार समित्यांसाठी आदेश बंधनकारक करण्यात आले आहेत.

तरच पर्यटनस्थळांत मिळेल प्रवेशबिबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला आणि पितळखोरा लेणी पर्यटनस्थळात लस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश मिळणार नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा किमान एक डोस घेणाऱ्यांना पर्यटनस्थळात प्रवेश मिळणे शक्य होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCorona vaccineकोरोनाची लस