शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश रद्द करण्यासंदर्भात याचिका; दिवाळीच्या सुटीनंतर सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:12 IST

वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांचा आदेश रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकांवर दिवाळी सुटीनंतर सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्दे गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या आदेशाला आव्हान

औरंगाबाद : वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांचा आदेश रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकांवर दिवाळी सुटीनंतर सुनावणी होणार आहे. यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्याची गरज नसल्याचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.३१) जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारा डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा अर्ज (आयए) फेटाळून तातडीने पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. मात्र, याचिकाकर्त्यांना गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या २३ आॅक्टोबर २०१८ च्या आदेशाला योग्य त्या प्राधिकरणापुढे आव्हान देण्याची मुभा दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ३१ आॅक्टोबरचा आदेश खंडपीठात सादर करून २३ आॅक्टोबर २०१८ चा वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती प्रवरा सहकारी साखर कारखान्यासह आणखी एका याचिकाकर्त्याने केली होती.मात्र, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी वरील याचिकांवर सुनावणी घेण्यास विरोध केला. त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, दोन दिवसांपूर्वीच वरीलप्रमाणे विनंती करणाºया याचिका खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याबाबत तातडीने सुनावणी घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करीत खंडपीठाने त्या याचिकांवर दिवाळी सुटीनंतर सुनावणी घेण्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.दरम्यान, गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या वतीने गुरुवारी (दि.१) औरंगाबाद खंडपीठात ‘कॅव्हेट’ दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाच्या ३१ आॅक्टोबरच्या आदेशाच्या अनुषंगाने जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या २३ आॅक्टोबरच्या आदेशाला विरोध करणारी अथवा पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका दाखल झाल्यास महामंडळाचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही अंतिम आदेश करूनये, अशी विनंती ‘कॅव्हेट’द्वारे महामंडळाच्या वतीने अ‍ॅड. चैताली चौधरी-कुट्टी यांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीCourtन्यायालय